Vijay Babu Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

लैंगिक अत्याचार प्रकरणात अभिनेता विजय बाबूला अटक; तीन जुलैपर्यंत होणार कसून चौकशी

एर्नाकुलम दक्षिण पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले असता पोलीसांनी विजय बाबू याला ताब्यात घेतले.

साम वृत्तसंथा

कोची: मल्याळम अभिनेता विजय बाबू याला लैगिंक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. एर्नाकुलम दक्षिण पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले असता पोलीसांनी (Police) विजय बाबू याला ताब्यात घेतले. (Vijay Babu Case)

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका अभिनेत्रीने विजय बाबू विरोधात दिली आहे. पोलीस घटनास्थळावरून पुरावे गोळा करतील, असे बोलले जात आहे. न्यायालयाने त्याला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. तसेच त्यांना कोणत्याही सोशल किंवा इतर माध्यमांसोबत संवाद साधू नये, असे निर्देश देण्यात आले होते.

विजय बाबू याच्याविरुद्ध लैंगिक छळाचा आणि दुसरा गुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारदाराची ओळख उघड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे आरोप?

कोची येथील फ्लॅटमध्ये विजय बाबूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारकर्त्या महिलेने केला आहे. विजय बाबूने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. विजय बाबूने चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने घाणेरडे काम केल्याचेही पीडितेने सांगितले. मात्र, विजय बाबूने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या महिलेविरुद्ध मानहानीचा दावा करणार असल्याचेही विजय बाबूने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बरळणाऱ्या सेजल पवार आधी FIR दाखल, आता KEM कॉलेजकडून मोठी कारवाई

Maharashtra News Live Update : बालगंधर्वमधील शोकसभेमुळे नागरिक संतप्त; नाटकाला उशिर होत नाट्य प्रेमी संतापले

Karjat Fort : प्राचीन गुहा, कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् मजबूत भिंती, 'हा' किल्ला आहे कर्जतजवळील खास आकर्षण

Palak Idli Recipe : मुलांच्या डब्यासाठी बनवा अण्णा स्टाईल मऊ लुसलुशीत पालक इडली, जाणून घ्या स्टेप्स

खळबळजनक! अल्पवयीन मुलाचा शेजाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT