Vidya Balan Recalls Begging Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vidya Balan Recalls Begging: विद्या बालनने अलिशान हॉटेलबाहेर मागितली भीक; कारण वाचून म्हणाल...

Vidya Balan Interview: लवकरच विद्या ‘नियत’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी तिने तिचा एक किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर केला.

Chetan Bodke

Vidya Balan Acted Beggar: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन गेल्या काही दिवसांपासून ती बॉलिवूड पासून दूर आहे. विद्याच्या नेहमीच फॅशनची चर्चा होत असते. लवकरच विद्याचा एक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच तिने चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिला एक डेयर मिळाला होता. चला तर जाणून घेऊया नेमका तिला काय डेयर मिळाला होता.

लवकरच विद्या ‘नियत’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच तिने चित्रपटानिमित्त सुरू असलेल्या प्रमोशनमध्ये एक मुलाखत दिली होती. एकदा डेयर करण्यासाठी तिने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलबाहेर भिकारी असल्याचे नाटक केले होते. तिने असे का केले यामागचे कारणही खुपच विचित्र आहे. यामागील कारण म्हणजे, तिने जिम-जॅम बिस्किटांसाठी हे काम केलं होते.

नुकतच Mashable ला दिलेल्या मुलाखतीत विद्या म्हणाली की, “आमचा इंडियन म्युझिक ग्रुप (IMG) असा एक ग्रुप होता. ते दरवर्षी तीन दिवसांचा शास्त्रीय संगीत आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा एक कार्यक्रम आयोजित करायचे. हा त्यांचा शो रात्रभर चालायचा. मी त्यामध्ये स्वयंसेवक होते. आम्ही सर्वच स्वयंसेवक कार्यक्रम व्यवस्थित व्हावा यासाठी काम करायचो, रात्री कार्यक्रम संपला की सर्वजण नरिमन पॉइंटकडे फिरायला जायचो.”

मुलाखतीत अभिनेत्री पुढे म्हणते, “एकदा मला एक चॅलेंज मिळालं होतं. माझ्या मित्रांनी मला Hotel Oberoi- The Palms मध्ये त्यांनी मला कॉफी शॉपमध्ये जाऊन दरवाजा वाजवायला सांगितले (Knock) आणि काहीतरी खाण्यासाठी मागायला लावले. मी सेलिब्रिटी आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. मी ते दार ठोठावत राहिले म्हणून ते नंतर माझी छेड काढायला लागले. मी काही वेळ दरवाजा ठोठावलानंतर मी त्यांना म्हणाले, प्लीज, मला भूक लागली आहे. कालपासून मी काहीच खाल्ले नाही. त्यानंतर माझा मित्र खजील आला आणि त्याने मला यायला सांगितले. तरी मी पैज जिंकले होते.”

जिम जॅम बिस्किटावर किती प्रेम होतं. या विषयी ती म्हणते, “ते चॅलेंज मी जिम- जॅम बिस्किटसाठी स्विकारले होते. त्या खास मैफिलीसाठी आमचा प्रायोजक ब्रिटानिया होता आणि आमच्याकडे भरपूर बिस्किटे होती. पण मी म्हणाले होते की मी जिंकले तर मला जिम जॅमचे आणखी एक पॅकेट मिळेल आणि मी तसं केलं.” अशाप्रकारे तिने एका जिम- जॅम बिस्कीट साठी काय काय केलं हे सांगितलं.

विद्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर, विद्या ‘नियत’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनु मेनन असून या चित्रपटामध्ये विद्या बालनसोबत राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपन्निता शर्मा आणि निक्की वालिया यांच्याही भूमिका आहेत. ती गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर होती. जरी सिनेसृष्टीपासून अभिनेत्री दूर असली तरी, ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT