Vicky Kaushal and Katrina Kaif Enjoying their Holiday in Maldives Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viral Photo : मालदीवच्या समुद्रात रोमान्स करताना दिसले विकी कौशल-कतरिना कैफ

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफ सध्या त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) सध्या त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. या कपलच्या मालदीवमधील सुट्यांचे मजेदार फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र आतापर्यंत या कपलने एकत्र फोटो शेअर केला नव्हता. विकीने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना खूश केलं आहे. विकी कौशलने या सुट्टीतील पत्नीसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही समुद्राच्या मधोमध रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

मालदीवमध्ये हे कपल कतरिनाच्या वाढदिवसानिमित्ताने व्हॅकेशनसाठी गेले आहेत. सनी कौशल त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शर्वरी वाघ, कतरिनाची बहीण इसाबेल कैफ, मिनी माथूर, निर्माता कबीर खान, अभिनेत्री इलियाना डिक्रूझ यांच्यासह हे कपल मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे. विकी कौशलने या व्हेकेशनचा नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कतरिनासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत.

विकीने आणखी काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तो त्याच्या मित्रांसोबत पूलमध्ये दिसत आहे. विकी, त्याचा भाऊ सनी कौशल, चित्रपट निर्माता कबीर खान, आनंद तिवारी आणि त्यांचे काही कुटुंबातील सदस्य आणि मित्र या फोटोंमध्ये दिसत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिनाचा आगामी चित्रपट 'फोनभूत' ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. त्याचबरोबर, विकी 'गोविंदा नाम मेरा'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो मेघना गुलजारच्या 'सॅम बहादूर'मध्ये सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेखसोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT