Vicky Kaushal and Kiara Advani Romantic Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video: विकी-कियाराचा बाथटब रोमान्स, नेटकरी म्हणाले, इतकी सुंदर बायको असून....

विकी कौशल आणि कियाराच्या या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहते.

Pooja Dange

Vicky-Kiara Romance: अभिनेता विकी कौशल नविन चित्रपटातची बरीच चर्चा सुरू आहे. 'गोविंदा नाम मेरा' हा त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपट त्याच्यासह भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत. या चित्रपटामुळे कियारा आणि विकी कौशल खूप ट्रेंड होत आहेत. विकी आणि कियाराच्या धमाकेदार डान्सचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रचंड गाजत होता. कियाराचा मराठमोळा लूक आणि विकीची टपोरी स्टाईल चाहत्यांना खूपच आवडली होती. आता या दोघांच्या नवीन गाण्याच्या टीझरवरून चाहते त्यांची मस्करी करत आहेत.

'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटातील नवीन गाण्याच्या टीझर प्रदर्शित झाला आहे. या गाण्यात विकी आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. त्यांची केमिस्ट्री पाहून संपूर्ण गाणे आणि चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. विकी कौशलने या गाण्याचा टीझर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यांच्या हा रोमान्स पाहून चाहते या दोघांची मस्करी करत आहते. कतरिनाची फॅन्स सुद्धा विकी कियारा या रोमान्सवर विनोदी कमेंट करत आहेत. विकी आणि कियाराच्या या केमिस्ट्रीची सोशल मीडियावर तारीफ देखील होत आहे. 'जो तूने पिलाई हुआ शराबी' असे या गाण्याचे बोल आहेत. (Vicky Kaushal)

या गाण्यातील विकी आणि कियाराचा लूक तर खूपच भारी आहे. कियाराने ब्लॅक बिकनी टॉप ड्रेस घातला आहे. तर डोळ्यांना गोल्डन मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. तसेच तिच्या अदा विकीसह चाहत्यांना सुद्धा घायाळ करत आहेत. ब्लॅक शर्ट आणि पॅन्टमध्ये विकी सुद्धा हॉट दिसत आहे. विकी आणि कियाराची सिजलिंग केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. (Movie)

विकी आणि कियाराचे चाहते या दोघांना मोठया पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु विकी आणि कतरिना यांचे काही महिन्यापूर्वीच लग्न झाले असल्याने या गाण्यावरून विकीची खूपच चेष्टा (चांगल्या अर्थाने) केली जात आहे. 'बायको असताना असे करताना लाज नाही वाटत का?, कतरिना जळत असेल, गाण्यातील रोमॅन्स कतरिनासोबत पाहायचा आहे', अशा कमेंट चाहते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT