Katrina Kaif Vicky Kaushal Instagram @vickykaushal09
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Vicky Kaushal: कतरिना- विकीची लग्नानंतरची पहिली दिवाळी, शेअर केले खास फोटो

कतरिना कैफ आणि विकी कौशलने साजरी केली पहिली दिवाळी, पोस्ट शेअर करत दिल्या चाहत्यांना शुभेच्छा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Katrina Kaif Vicky Kaushal Diwali Celebration: दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद आणि प्रेम घेऊन येते. हा सण सगळ्यांसाठी खास असतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमच्या जोडीदारासोबत दिवाळी सेलिब्रेट करत असाल तर ती आणखी खास होते. त्यात लग्नानंतरची पहिली दिवाळी जरा जास्तच खास असते.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हे नुकतेच त्यांच्या लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करत आहेत. बरं, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले. ही त्यांची पहिली दिवाळी आहे आणि ते ती अतिशय सुंदर पद्धतीने साजरी करत आहेत.

कतरिना कैफने (Katrina Kaif) इन्स्टाग्रामवर पती विकी कौशलसोबतचे फोटो शेअर केले. तिने फोटो शेअर करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कतरिना पिवळ्या रंगाच्या साडीत चमकदार दिसत होती तर विकी पांढऱ्या कुर्त्यात देखणा दिसत होता.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी विकी कौशलने (Vicky Kaushal) कतरिनासोबत लक्ष्मीपूजन करतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. तसेच 'घरातील लक्ष्मीसह लक्ष्मीपूजन केले. तुम्हा सर्वांना आमच्याकडून दीपावली हार्दिक शुभेच्छा', असे कॅप्शन देखील दिले आहे.

Katrina Kaif Vicky Kaushal Diwali Celebration

विकी कौशल 'सॅम बहादूर बायोपिक', 'द इमॉर्टल अश्वथामा'मध्ये आपल्याला दिसणार आहे. तसेच तो सारा अली खानसोबत ही एका चित्रपटातही दिसणार आहे. (Movie)

'मेरी ख्रिसमस'मध्ये कतरिना कैफ विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. सलमान खानसह तिचा 'टायगर 3' पुढच्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री सध्या तिच्या 'फोन भूत' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे, जो 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Diwali)

'फोन भूत'ची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटने केली आहे, याचे दिग्दर्शन 'मिर्झापूर' फेम दिग्दर्शक गुरमीत सिंग यांनी केले आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT