Veteran Telugu actress Pavala Shyamala has passed away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Death: ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेविश्वात हळहळ

Actress Death: ज्येष्ठ तेलुगू अभिनेत्री पवला श्यामला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चार दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या निधनाने दक्षिण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली.

Shruti Vilas Kadam

Actress Death: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री पवला श्यामला यांचे मंगळवारी (२८ जुलै) वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. हैदराबादमधील उस्मानिया जनरल रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहते आणि अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पवला श्यामला गेली चार दशकांहून अधिक काळ तेलुगू चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. आपल्या भूमिकामधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या सहज अभिनयशैलीमुळे त्या प्रत्येक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

मागील काही महिन्यांपासून पवला श्यामला या वयोमानानुसार उद्भवलेल्या विविध आजारांशी झुंज देत होत्या. काही आठवड्यांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याच्या बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले

पवला श्यामला यांनी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. स्वर्णकमलम, कर्तव्यम, इंद्रा, खडगम, वर्षम आणि आंध्रवाला यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. सहाय्यक कलाकार असूनही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने तेलुगू चित्रपटसृष्टीने एक अनुभवी आणि गुणी अभिनेत्री गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सणासुदीआधी सोन्याचा मोठा झटका! 24K सोनं पोहोचलं ₹1,55,890 वर, वाचा तुमच्या शहरातला नवा दर

Maharashtra News Live Update: फडणवीस दिल्लीत जावेत म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवलेत- संजय राऊत

हाय कोलेस्ट्रॉलमुळे शरीरामध्ये होतात 10 बदल; पायांपासून छातीपर्यंत अशी दिसतात लक्षणं

मोठी बातमी! अभिजीत दीपके यांना सत्ताधारी खासदाराची थेट ऑफर, म्हणाले...

काँग्रेसच्या दिग्गज महिला नेत्याचे निधन; महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT