Famous Marathi Singer Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Famous Marathi Singer Death: मराठी संगीत विश्वातील ज्येष्ठ गायक आणि संगीतकार गोविंदराव पोवळे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी सुगम संगीत विश्वावर शोककळा पसरली.

Shruti Vilas Kadam

Famous Marathi Singer Death: मराठी भावगीत आणि सुगम संगीत विश्वातील ज्येष्ठ गायक व संगीतकार गोविंदराव पोवळे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. शनिवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी संगीतविश्वावर शोककळा पसरली असून, सुगम संगीताच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

‘माती सांगे कुंभाराला’, ‘रात्र काळी घागर काळी’ यांसारख्या अजरामर गीतांनी गोविंदराव पोवळे यांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या आवाजातील भावपूर्णता आणि संगीताची साधी, पण मनाला भिडणारी शैली यामुळे त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर कायम आहेत.

पनवेलजवळील चिरनेर गावात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील त्रिंबक पोवळे हे कीर्तनकार होते, तर आई पार्वतीबाईंनाही संगीताची विशेष आवड होती. त्यामुळे संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला. शालेय जीवनात कविता सादर करताना त्यांच्या गायनकौशल्याची पहिली झलक शिक्षक आणि कुटुंबीयांना दिसून आली.

अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी आकाशवाणीवर गायनासाठी ऑडिशन दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांची निवड झाली. त्या काळात आकाशवाणीवर सुगम संगीत सादर करणारे ते सर्वात तरुण गायक ठरले. ३० मार्च १९४८ रोजी त्यांचे पहिले गाणे थेट प्रसारित झाले आणि तेथून त्यांच्या संगीतप्रवासाला खरी सुरुवात झाली. पुढे अनेक दशकं त्यांनी गायक आणि संगीतकार म्हणून आकाशवाणीशी घट्ट नातं जपलं.

गोविंदराव पोवळे यांनी अनेक लोकप्रिय गाण्यांना संगीत दिले. ‘उमटली रामाची पाऊले’, ‘पैंजण हरीचे वाजती’, ‘शुभंकरोती कल्याणम’ आणि ‘कामधाम संसार विसरुनी’ यांसारखी गाणी आजही मराठी संगीत रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांनी शंभराहून अधिक गाणी संगीतबद्ध केली होती. तसेच १९५७ मध्ये गिरगावमध्ये सुगम संगीताचे वर्ग सुरू करून अनेक नवोदित कलाकार घडवले. त्यांच्या निधनाने मराठी भावगीत आणि सुगम संगीत क्षेत्रातील एक सुवर्णपान इतिहासजमा झाल्याची भावना कलाकार आणि चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT