Actress Death: कन्नड मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री ललितम्मा यांचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले. रंगभूमी, चित्रपट आणि टेलिव्हिजन अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या ललितम्मा यांच्या निधनाने कन्नड कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दिग्गज अभिनेता दर्शनच्या सुंतरा गाली या चित्रपटातील ‘सारायी शारदे’ या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती.
ललितम्मा गेल्या काही काळापासून आजारी होत्या. वृत्तानुसार, त्यांना सुमारे अडीच महिन्यांपूर्वी स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्या अंथरुणाला खिळून होत्या. बंगळुरू येथील ‘अम्मन मडिलु ट्रस्ट’ या वृद्धाश्रमात त्यांच्या शेवटच्या काळात त्यांची काळजी घेतली जात होती. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ललितम्मा यांनी २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता दर्शनच्या 'सुंतरा गाली' या चित्रपटात ‘सारायी शारदे’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटातील त्यांच्या खलनायकेच्या भूमिकेची चांगलीचं चर्चा रंगली. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीत त्यांना अनेक संधी मिळाल्या. यानंतर त्यांनी जंगली, लाइफू इष्टेने, जाकी, वज्रकाय, कित्थूर यांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यासोबत त्यांनी अनेक विनोदी व्यक्तिरेखा देखील उत्तम प्रकारे साकारल्या.
चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी ललितम्मा यांनी रंगभूमीवर काम केले होते. वृत्तांनुसार, त्यांनी १८० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला होता. जवळपास ३५ वर्षे रंगभूमीवर काम केले. कन्नड टेलिव्हिजनवरील रंगोली, मांगल्य आणि महामायी यांसारख्या मालिकांमध्येही त्या झळकल्या. चित्रपटांप्रमाणेच छोट्या पडद्यावरही त्यांची ओळख निर्माण केली. ललितम्मा यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कन्नड चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे. रंगभूमीपासून चित्रपट आणि मालिकांपर्यंत आपल्या अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाने कन्नड कलाविश्वाने एक अनुभवी कलाकार गमावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.