Sunil Dutt-Nargis Love Story
Sunil Dutt-Nargis Love Story Facebook: Timeless Indian Melodies
मनोरंजन बातम्या

Sunil Dutt-Nargis Love Story: नरगिसशी लग्न करण्यासाठी सुनील दत्तना घ्यावी लागली होती अंडरवर्ल्ड डॉनची परवानगी ; जाणून घ्या नेमका काय आहे किस्सा

Pooja Dange

HBD Sunil Datt : साधना, सुजाता, मुझे जीने दो, मदर इंडिया यांसारख्या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. अॅक्टींगने समस्त प्रेक्षकांची मने त्यांनी जिंकली होती. दमदार आवाजांनी ९०च्या दशकात एक नवी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे सुनील दत्त. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या भूमिका अजुनही प्रेक्षकांच्या हृदयात ताज्या आहेत. त्यांच्या कामाचं कौतुक अजुनही होताना दिसतंय.

इंडस्ट्रीमध्ये ४० वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी स्वतःची वेगळीच छाप सोडली होती. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना फिल्मफेअर लाइफटाइम अवॉर्ड व १९६८ मध्ये पद्मश्री अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले होते.

सुनीत दत्त म्हटल की आपसुकच नरगिसचं नाव त्यांच्यासोबत जोडल जातं. सुनील दत्त आणि नरगिस यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. नरगिसने तिच्या सौंदर्याने अनेक तरुणांना घायाल केले होते. (Latest Entertainment News)

नरगिस आणि सुनील दत्त यांची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती. चित्रपटात जेवढे कष्ट हिरोला हिरोईनला पटवण्यासाठी करावे लागतात. त्याहीपेक्षा जास्त कष्ट हे सुनील दत्त यांनी नरगिसशी लग्न करण्यासाठी केले आहेत. सुनील दत्त त्यांनी नरगिसशी लग्न करून नये यातही चक्क डॉनची धमकी आली होती.

सुनील दत्त आणि नरगिसची लव्हस्टोरी

आघाडीची अभिनेत्री म्हणून नरगिस प्रसिद्ध होत्या. मदर इंडिया हा चित्रपट भारतातील पहिला ऑस्कर नॉमिनेशनपर्यंत पोहोचलेला चित्रपट होता. मदर इंडियामध्ये सुनिल दत्त आणि नरगिस यांनी एकत्र काम केले होते. त्यांच्या चित्रपटासारखीच त्यांची रिअल लाईफ लव्हस्टोरीही तितकीत प्रसिद्ध आहे.

सुनील दत्त आणि नरगिस यांचे एकमेकांवर प्रेम होते. पण लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास हा काही सोपा नव्हता. लग्नासाठी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या प्रेमातील पहिला अडथळा म्हणजे त्यांचे धर्म. नरगिस या मुस्लीम कुटुंबातून होत्या तर सुनील हिंदू कुटुंबातून होते. त्यांच्या धर्मांमुळेच त्यांच्या नात्याला विरोध झाला. (Celebrity)

चक्क डॉनने दिली सुनील यांना नरगिसशी लग्न न करण्याची धमकी

सुनील आणि नरगिसच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. त्यांच्या अफेअर बातम्याही छापल्या जात होत्या. त्यांच्या अफेअरबाबत सर्वत्र चर्चा होच असतानाच त्यांना एक धमकी आली. मुंबईच्या डॉनने त्यांना नरगिसशी लग्न करु नको अशी धमकी दिली होती. डॉनचा त्यांच्या आंतरजातीय लग्नाला विरोध होता.

म्हणतात ना प्रेमाला सीमा नसतात. सुनील यांनी थेट जाऊन त्या डॉनची भेट घेतली. सुनील दत्त त्या डॉनला म्हणाले, 'माझं नरगिसवर खूप प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायच आहे. मी तिला नेहमी खूश ठेवेन. जर तुम्हाला मी चुकीचं करतोय असं वाटलं तर गोळी घाला आणि बरोबर वाटलो तर मिठी मारा.' हे ऐकल्यावर डॉनने आनंदी होऊन सुनील दत्तना मिठी मारली. सर्व विरोध पत्करुन त्यावर मात करत अखेर १९५८ मध्ये त्यांच लग्न झालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramda Athawale on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे तुमचे नखरे, रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी

Shiv Sena UBT: मुलुंडप्रकरण तापलं! ठाकरे गटाच्या 5 जणांना अटक, नेमका ठपका काय?

Periods Tips: मासिक पाळी दरम्यान या चुका करू नका, नाहीतर...

Today's Marathi News Live: महायुतीने सावरकरांच्या नावावर केवळ राजकारण केलं; अरविंद सावंत

Ramdas Athawale : मविआला देत आहोत अशी टक्कर की, नेत्यांना आली पाहिजे चक्कर; आठवलेंचा चारोळीतून विरोधकांना भन्नाट टोला

SCROLL FOR NEXT