Raja Bapat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raja Bapat: जेष्ठ अभिनेते राजा बापट काळाच्या पडद्याआड

जेष्ठ अभिनेते राजा बापट यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Pooja Dange

Raja Bapat News: जेष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन झाले आहे. अभिनेते राजा बापट यांचे काल (२६ डिसेंबर, २०२२) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी जगाच निरोप घेतला. राजा बापट यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

राज बापट हे युनियन बँकेतुन मॅनेजर म्हणून निवृत्त झाले होते. बँकेत काम करताना त्यांनी अभिनय करण्याचा छंद देखील जोपासला. सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. तसेच कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती.

राजा बापट यांनी मराठीसह हिंदी आणि इंग्रजी नाटकांमध्ये सुद्धा काम केले होते. 'एकटी', 'जावई विकत घेणेआहे' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'यशोदा', 'श्रीमंत', 'हमीदाबाईची कोठी', 'पप्पा सांगा कुणाचे', 'शांतुतल', 'सागर माझा प्राण', 'जन्मदाता', 'शांतता कोर्ट चालू आहे' या नाटकांमध्ये विविधरंगी भूमिका पार पडल्या होत्या. राजा बापट यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये देखील कामी केले आहे.

राजा बापट यांच्या मागे त्यांच्या पत्नी सुषमा, मुलगी शिल्पा, जावई गिरीश म्हसकर आणि नातवंडं असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोक पसरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आयोगाची निष्पक्षता संपली, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा- खरगे

IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

Blood Group and Diabetes: A, B, AB की O? कोणत्या ब्लड ग्रुपला डायबिटीजचा सर्वाधिक धोका?

Thane News: ठाकरेसेनेच्या नेत्याच्या हत्येमागे माजी महापौर शिंदेंचा हात?, ठाण्यात राजकारण तापले

Bribe Case : गृहमंत्रालयातील २ अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, FCRA प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT