Nana Patekar saam tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar: मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं आहे. गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन झाल्याची माहिती आहे. नाना यांच्या अकाली एक्झिटने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर म्हणजेच नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतील हे एक दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू करत त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि खास शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये नाना पाटेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

रंगभूमीपासून सिनेमापर्यंतचा प्रवास

नाना पाटेकर यांच्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीपासून झाली. त्यांच्या अभिनयाची खरी जडणघडण मराठी रंगभूमीवरच झाली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली.

यानंतरच्या काळात नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. हळूहळू त्यांच्या अभिनयाची वेगळी शैली प्रेक्षकांच्या लक्षात येऊ लागली.

‘सलाम बॉम्बे!’ आणि ‘परिंदा’मुळे मिळाली वेगळी ओळख

1988 मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र त्यानंतर आलेला 1989 चा ‘परिंदा’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीसाठी मोठा टप्पा ठरला.

या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘अण्णा’ ही व्यक्तिरेखा विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नाना पाटेकर यांच्या दमदार संवादांनी आणि भूमिका साकारताना व्यक्तिरेखेत पूर्णपणे शिरण्याच्या त्यांच्या शैलीने त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. यानंतर ते आपल्या अभिनयाच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची लोणावळामध्ये कारवाई

Nana Patekar : मुरूडच्या किनाऱ्यापासून अभिनयाच्या शिखरापर्यंत... असा राहिला भारतीय सिनेसृष्टीच्या 'नटसम्राट'चा जीवनप्रवास

EPFO Update : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! आता UPIद्वारे काढता येणार PFचे पैसे; जाणून घ्या नवी सुविधा

Navratri 2026: नवरात्रीत रोज दिसा हटके! नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी परफेक्ट लूक आयडिया

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दसऱ्याचं गिफ्ट मिळणार, या तारखेला खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT