Vedat Marathe Veer Daudale Saat  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vedat Marathe Veer Daudale Saat : अक्षय कुमारच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शुटिंगला ब्रेक, नेमकं कारण काय ?

Vedat Marathe Veer Daudale Saat Shooting Stop : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शुटिंगला ब्रेक लागलेला आहे.

Chetan Bodke

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाची घोषणा केल्यापासून तुफान चर्चेत आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची शुटिंग सुरू आहे. पण नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या शुटिंगला ब्रेक लागलेला आहे. निर्माते वसीम कुरेशी यांनी चित्रपटाची शुटिंग थांबवलेली आहे.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. अक्षय कुमार चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका साकारणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या शुटिंगला ब्रेक लागल्याचे कळत आहे. निर्मात्यांनी बजेटच्या समस्येमुळे शुटिंग थांबवलेली आहे. चित्रपटाची शुटिंग तब्बल ५० % पूर्ण झालेली आहे. अक्षय कुमार चित्रपटामध्ये कॅमिओ रोल साकारणार असला तरी तो प्रमुख भूमिकेत आहे. दरम्यान, अक्षयला त्याच्या मानधनाचा मोठा हिस्सा देण्यात आलाय.

पण आता अक्षय उर्वरित चित्रपटाची शुटिंग पूर्ण करणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. आता 'वेडात मराठे वीर दौडले सात'चं शुटिंग कसं पूर्ण होणार आणि चित्रपट केव्हा रिलीज होणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. अक्षय कुमार स्टारर 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाची घोषणा २०२२ मध्ये केली होती. या चित्रपटाची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आलेली होती. चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमारसह सिद्धार्थ जाधव, विशाल निकम, विराट मडके, जय दुधाने, डॉ.उत्कर्ष शिंदे, हार्दिक जोशी, प्रविण तरडे, आरोह वेलणकर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT