Ved Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ved Movie Success: बॉक्स ऑफिसवर 'वेड' सिनेमाचा धूमाकूळ; अवघ्या तीन दिवसात केली 'इतकी' कमाई, रितेशने मानले प्रेक्षकांचे आभार

बॅाक्स ॲाफिसवर 'वेड' सिनेमाने अवघ्या ३ दिवसांत १३ कोटींचा गल्ला केल्यानंतर रितेशने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

श्रेयस सावंत

Ved Box Office Collection : रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. वेड सिनेमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. सोशल मीडियावरही 'वेड' सिनेमाची बरीच चर्चा होत आहे. बॅाक्स ॲाफिसवर 'वेड' सिनेमाने अवघ्या ३ दिवसांत १३ कोटींचा गल्ला केल्यानंतर रितेशने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. (Latest Marathi News)

रितेशचा 'वेड' सिनेमा ३० डिसेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. रितेश देशमुख दिग्दर्शित हा 'वेड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. त्यामुळे 'वेड' सिनेमा विक्रमी कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

दुसरीकडे महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेचं रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांना आज सिनेसृष्टीत २० वर्ष पूर्ण झाली आहे. 'तुझे मेरी कसम' या सिनेमापासून सुरू झालेला प्रवास हा आता 'वेड' या सिनेमापर्यंत पोहचला आहे. हा आनंदाचा दिवस रितेश-जेनिलिया यांनी सगळ्यांसोबत साजरा केला.

एकिकडे २० वर्षांचा आनंद तर दुसरीकडे वेड सिनेमाचा बॅाक्स ॲाफिसवर १३ कोटींचा गल्ला फक्त ३ दिवसात कमावला आहे. या निमित्ताने रितेश-जेनिलियाचा धमाल आंनदाज पाहिला मिळाला.

एवढचं नव्हे तर या वेळी महाराष्ट्राच्या लाडक्या दादा आणि वहिणीने या वेळी उखाणा ही घेतला आहे. रितेश देशमुखने या कार्यक्रमात उखाणा घेतला. भाजीत भाजी मेथीची, जेनेलिया माझ्या प्रितीची, हा उखाणा रितेशने घेतला. या कार्यक्रमात रितेशने संवाद साधला.

'तुम्ही हा चित्रपट पाहत आहात. तुम्हाला चित्रपट आवडत आहे. तुम्ही लोकांना सिनेमा पाहण्यास सांगत आहात. आपला सिनेमा म्हणून हा सिनेमा पाहत आहात, यासाठी खरंच आभारी आहे, अशा शब्दात रितेशने प्रेक्षकांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT