Vaibhav Mangle Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vaibhav Mangle: 'ती मी नाहीच' वैभव मांगलेने 'अलबत्या गलबत्या' नाटकाला केले रामराम

'ती मी नव्हेच' असे म्हणत वैभव मंगलेने एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्याने या नाटकातले काही फोटो देखील शेअर केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वैभव मांगले(Vaibhav Mangle) सध्या अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. झी स्टुडिओज निर्मित 'टाइमपास ३'(Timepass 3) चित्रपट असो वा सध्या 'झी मराठी'वरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' कार्यक्रमात साकारलेली 'चिंची चेटकीणी'ची भूमिका असेल. सोबतच वैभव कधी कधी सोशल मीडियाच्या गऱ्हाळ्यात येत असतो. आज वैभव पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याचे कारणही तसेच आहे. ज्या नाटकातील पात्राने 'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये चिटकणीचे पात्र साकारले आहे, त्याच पात्रावरील नाटक म्हणजे 'अलबत्या गलबत्या'. ज्या नाटकाने त्याला प्रसिद्धी मिळवली त्या नाटकाला त्याने रामराम केला आहे. सोबतच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

'ती मी नव्हेच' असे म्हणत वैभव मंगले यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यासोबतच त्यांनी या नाटकातले काही फोटो देखील शेअर केले आहे. नाटक सोडण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून निर्मात्यांसोबत काहीतरी वादविवाद झाल्याचे मनोरंजन विश्वात बोलले जात आहे. आता वैभव मांगले यांच्याऐवजी अभिनेता निलेश गोपनारायण ‘चिंचि चेटकिणी’ची भूमिका साकारणार आहे.

काही वेळेपूर्वी अभिनेते वैभव मांगलेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली होती. त्यात वैभव म्हणतो, " प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी 'चिंचि चेटकीणीचे' काम सोडले आहे. तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की, ‘ती मी नाहीच’.

सध्या सोशल मीडियावर नवीन चिंचि चेटकिणीचे अर्थात निलेश गोपनारायण यांचे फोटो प्रचंड चर्चेत आहेत. विशेष बाब, वैभव मांगलेने साकारलेली भूमिका चेटकीण तसेच निलेश गोपनारायण साकारत असलेले चेटकीण हे सारखेच दिसतात. दोन्ही कलाकारांचे फोटो पाहिल्यावर फरकही ओळखू येत नाही. या नाटकाची पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली. नाटकाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर वैभव मांगलेंना प्रेक्षकांकडून विचारणा होऊ लागली की, आम्ही येतोय नाटकाला, आम्हाला भेटू शकाल का? चाहत्यांच्या या प्रश्नावर, दुसऱ्या एका अभिनेत्याला वैभव मांगले समजून प्रेक्षकांचा भ्रमनिरास होऊ नये, म्हणून वैभव मांगले यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

Edit By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT