Vedat Marathe Veer Daudale Saat Team Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Viral Video: आरारारा खतरनाक... कोल्हापुरात ज्योतिबाचं दर्शन अन् पंगतीत जेवण... ‘वेडात मराठे...’च्या टीमचा व्हिडीओ व्हायरल

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या टीमने ज्योतिबाचं दर्शन घेतलं असून त्यानंतर सर्वांनी पंगतीत बसून जेवणाचा अस्वाद घेतला.

Chetan Bodke

Vedat Marathe Veer Daudale Saat Team Viral Video: महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाल्या पासून चर्चा सुरू आहे. अनेक ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर अखेर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक तगड्या कलाकारांची फौज दिसणार आहे.

अनेक आपल्या अभिनयात माहीर आहेत तर अनेक जण या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टीमने ज्योतिबाचं दर्शन घेतलं असून त्यानंतर सर्वांनी पंगतीत बसून जेवणाचा अस्वाद घेतला.

उत्कर्ष शिंदे ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तो या चित्रपटात सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या कोल्हापुरात सुरू आहे. उत्कर्ष नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत त्याच्या चाहत्यांशी संपर्कात राहतो. आता त्याने एक व्हिडिओ पोस्ट करून या चित्रपटाच्या शूटिंगच्या प्रक्रियेत त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळत असल्याचं सांगितलं आहे.

काल उत्कर्षने एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर सर्व एकत्र बसत पंगतीतल्या जेवणाचा अस्वाद घेतल्याचा किस्सा व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला. तो पोस्ट करत म्हणतो, “ ‘वेडात मराठे वीर दौडले सात’चं आमचं शूटिंग कोल्हापूरमध्ये करत असताना आमचे दिग्दर्शक महेश मांजरेकर सर सर्व टीम मेंबर्स ला ‘दख्खनचा राजा ज्योतिबा देवस्थान’ला घेऊन गेले. त्यांच्या दिग्दर्शनात एक नट म्हणून इतकं काही शिकतोय ते शब्दात सांगता येण्या सारखं नाहीये. एक वेगळाच अनुभव सर्व गुणी कलाकारांसोबत वेळ घालवता येतोय, प्रवीण तरडे दादा, सिद्धू दादा आणि माझे सर्व अन्य मित्र.”

तसच तो पुढे म्हणतो, “ह्या सर्वांसोबत जोतिबा देवस्थान गेलो असता यांच्या सोबत जमिनिवर पंगतीती बसून जेवता आलं. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेता आला. खरं तर इतक्या गप्पा गोष्टी अनुभव घडतायेत की माझ्या येणाऱ्या आयुष्याला समृद्ध करतील असे क्षण व्यतीत करतोय सध्या. एक कलाकार म्हणून एक व्यक्ती एक माणूस म्हणून खूप काही शिकायला मिळत आहे सर्वांकडून. तुम्हा सर्व रसिक मायबापाच्या आशीर्वादामुळे हे शक्य होत आहे.” सध्या उत्कर्षची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून चाहते त्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. सोबतच त्यांनी जेवणाचा अस्वाद घेतल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार : प्रफुल्ल पटेल

Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

Long Hair Gajra Hairstyle: लांब केसांसाठी गजरा माळणाच्या 5 युनिक हेअरस्टाईल्स, पारंपारिक लूक दिसेल उठून

SCROLL FOR NEXT