Urvashi Rautela With Chiranjeevi Instagram/@urvashirautela
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela: दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसणार उर्वशी रौतेला, मेगास्टार चिरंजीवीसोबतचा फोटो केला शेअर

उर्वशी रौतेला या चित्रपटात एक आयटम साँग करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urvashi Rautela Share Photo With Chiranjeevi: अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे सुंदर फोटो आणि व्हिडियो ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्वशी लवकरच 'वॉल्टेअर वीराया' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती साऊथमधील मेगास्टार चिरंजीवीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. उर्वशीने नुकताच चिरंजीवीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि साऊथ सुपरस्टार चिरंजीवी दिसत आहेत. फोटोमध्ये चिरंजीवी यांनी उर्वशीच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आहे. लूकबद्दल बोलायचे तर चिरंजीवी ग्रे जीन्स आणि व्हाइट टी-शर्टमध्ये आहे. तर उर्वशीने लाल शर्ट आणि गुलाबी जीन्स घातली आहे. एकूणच उर्वशी नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. (Urvashi Rautela)

या फोटोसोबत उर्वशी रौतेलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा मी पुरस्कार जिंकते तेव्हा मी माझ्या आई-वडिलांचा विचार करते. माझ्यासाठी, सर्वोत्कृष्ट असणे म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये आणि विश्वात ते स्वतःला सिद्ध करणे आहे. धन्यवाद मेगास्टार चिरंजीवी.' उर्वशी रौतेलाचा चिरंजीवीसोबतचा फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. या फोटोला आतापर्यंत ३ लाख १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोवरील उर्वशीच्या लूकचे अनेकांनी कौतुक केले आहे. त्यामुळे काही लोकांनी ऋषभ पंतचे नाव घेऊन अभिनेत्रीची खिल्ली उडवली आहे. (Social Media)

दिवाळीच्या मुहूर्तावर मेगास्टार चिरंजीवी यांनी त्यांच्या आगामी 'वॉल्टेअर वीराया' या चित्रपटाची घोषणा केली होती. हा एक अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉबी कोल्ली करणार आहे. या चित्रपटात चिरंजीवीशिवाय श्रुती हासन दिसणार आहे. उर्वशी रौतेला या चित्रपटात एक आयटम साँग करणार आहे. हे गाणे ग्लॅमरस डिवा आणि चिरू यांच्यावर चित्रीत होणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT