Urvashi Rautela Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela 'या' ड्रेसमध्ये दिसतेय खूपच बोल्ड; सगळ्यांच्या नजरा या 'हसींना'वर खिळल्या

बॅालिवूड अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन उर्वशी रौतेला तिच्या बोल्डनेसमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर उर्वशी चांगलीच सक्रीय असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urvashi Rautela Bollywood News Update | मुंबई: बॅालिवूड अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) तिच्या बोल्डनेसमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर उर्वशी चांगलीच सक्रीय असते.

सोशल मीडियावर (Social Media) उर्वशीचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी उर्वशी हिने पुन्हा एकदा इंटरनेट विश्वाचा पारा वाढवला आहे. उर्वशीने चाहत्यांसोबत असा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. उर्वशी तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतेच उर्वशीचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. ज्यात ती बॅक पोज देत आहे. उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela Instagram) तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर तिच्या लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती शॉर्ट ड्रेसमध्ये 'बोल्ड' दिसते आहे. सोबतच तिने केसांचा हाय पोनी आणि ग्लॅासी मेकअप केला आहे. ज्यामुळे उर्वशी रौतेला खूपच हॅाट दिसत आहे. अनेकांनी तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.

फोटोंमध्ये उर्वशी रौतेला तिच्या बॅक पोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. उर्वशीच्या या पोस्टला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहे. काही तासांतच लाखो लाईक्स उर्वशीच्या हॅाट लूकला आले आहेत. त्याशिवाय फोटोवर चाहत्यासंह अनेक सेलिब्रिटींनीही कॉमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने, फायर इमोजीसह, 'आपने तो आग लगा दी' अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने 'हॅाट पोज' अशी कॉमेंट केली आहे.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, उर्वशी तिच्या आगामी 'द लीजेंड' चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये उर्वशी दाक्षिणात्य अभिनेता सरवणनसोबत दिसणार आहे. सध्या उर्वशी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याशिवाय दिल है ग्रे आणि द बॅल्क रोज या चित्रपटातही ती दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT