Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे उर्मिला घेणार मोठा निर्णय?

Urmila Matondkar : घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता बिग बॉस 18 मध्ये झळकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉस 18 (Bigg Boss 18) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोमध्ये कोणते सदस्य पाहायला मिळणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अनेक मोठ्या सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. आता बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच (Urmila Matondkar ) नाव देखील समोर आलं आहे. उर्मिला मातोंडकर बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

उर्मिला आणि सलमान (Salman Khan) पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहेत. यांची मैत्री देखील खूप छान आहे. या दोघांनी 'जानम समझा करो' या चित्रपटात काम केलं आहे. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना देखील खूप आवडला. उर्मिला मातोंडकरने 90 च्या दशक गाजवले आहे. तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. उर्मिलाने अनेक रिॲलिटी शो जज केले आहेत.

उर्मिला अलिकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. उर्मिलाने पती मोहसीन अख्तर मीरसोबत घटस्फोट घेतल्याची चर्चा सर्वत्र चांगलीच रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिने घटस्फोटासाठी मुंबई न्यायालयात अर्ज देखील केल्याचे म्हटलं जात आहे. त्यांचा हा 8 वर्षांचा संसार होता.

बिग बॉस 18च्या स्पर्धकांच्या यादीत करणवीर मेहरा, निया शर्मा, शोएब इब्राहिम, धीरज धूपर, नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा आणि शहजादा धामी या सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. 6 ऑक्टोबर पासून तुम्हाला बिग बॉस 18 शो पाहायला मिळणार आहे. बिग बॉस 18 चं होस्टिंग सलमान खान करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT