Urfi Javed  Saam Tv
मनोरंजन बातम्या

उर्फी जावेदचा फिलिंग ब्ल्यू लूक आला समोर, व्हिडीओ पाहून चाहते थक्क

उर्फीने नवीन लूकमधील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उर्फी जावेदकडे (Urfi Javed) कोणताही प्रोजेक्ट नसला तरीही तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. उर्फी तिच्या स्टाईलमुळं कायमच चर्चेत असते. हॉट आणि बोल्ड लूकने प्रकाशझोतात राहणाऱ्या उर्फीला ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. ट्रोलिंगचा सामना करताना देखील उर्फी लाईमलाईटमध्ये येण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे उर्फी सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात चर्चेत असते.

नुकताच उर्फीने नवीन लूकमधील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. उर्फी जावेद पुन्हा एकदा नव्या लूकमध्ये चाहत्यांच्या भेटीला आली आहे. उर्फीचा हा लूक पाहून चाहत्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. काही तासातंच उर्फीच्या या लूकवर लाखोंच्या घरात लाईक्स आले आहेत.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केली आहे. 'फिलिंग ब्ल्यू' असा कॅप्शन देत उर्फीने तिचा नवीन लूक सादर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी अॅटीट्यूडमध्ये कॅटवॉक करताना दिसते आहे. उर्फीने थाई स्लिट गाऊन परिधान केला आहे. उर्फीने रेड लिपस्टिक, कानांत ब्ल्यू एअररिंग्स, हाय हिल्स सह ग्लॉसी मेकअप केला आहे.

उर्फी जावेद सोशल मीडियावर 'व्हायरल गर्ल' म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्या उर्फीचा नवीन लूक चाहत्यांना आश्चर्यचकित करतो आहे. उर्फी नेहमीच नवीन प्रयोग करत चाहत्यांच्या भेटीला येत असते. चाहत्यांमध्ये उर्फीच्या हटके स्टाईलचा क्रेझ निर्माण झाले आहे. अनेकदा चाहते उर्फीच्या नवीन ड्रेसिंगसेन्सच्या प्रतिक्षेत असतात. उर्फी जावेदने बिग बॉस शोमधून विशेष ओळख निर्माण केली आहे. यासह 'दुर्गा', 'सात फेरों की हेराफेरी', 'बेपनाह','जीजी मां', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये उर्फी झळकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT