Urfi Javed New Outfit Instagram @urf7i
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Jacket Goes Viral: उर्फीची दुसरी बाजू पहिल्यांदाच बघायला मिळाली; ड्रेस असा घातला की कौतुकाचा पाऊसच पडला!

Urfi Javed New Outfit: उर्फीचा सुपर क्यूट लूक समोर आला आहे.

Pooja Dange

Urfi Javed Teddy Bears Jacket: उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड आणि ऑफबीट फॅशनमुळे चर्चेत असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फीला तिच्या लूक आणि आऊटफिटमध्ये नवनवीन प्रयोग करायला आवडतात. ज्यामुळे काही लोकांना ती आवडते तर काही लोक तिला ट्रोल करतात. अलीकडेच उर्फीचा सुपर क्यूट लूक समोर आला आहे.

उर्फीने यावेळी सॉफ्ट टॉयने बनवलेले जॅकेट घातले आहे. तिचा हा लेटेस्ट आउटफिट पाहून सगळ्यांनी तिचे कौतुक केले आहे. उर्फीने या ड्रेसमध्ये क्युट पद्धतीने एन्ट्री केली आणि लाइमलाइटमध्ये आली. तिची ही फॅशन अनेकांना आवडली आहे. (Latest Entertainment Update)

उर्फी जावेदने पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. या ड्रेसच्या बस्टच्या खाली एक छोटा कट दिसत होता. या मिनी ड्रेसमध्ये ती तिचे फ्लॅट टमी आणि लेग्स फ्लॉंट करत होती. उर्फीने आऊट ऑफ द बॉक्स दिसण्यासाठी रंगीबेरंगी जॅकेट घातले होते, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

उर्फीचे हे बहुरंगी जॅकेट सॉफ्ट टॉईजपासून बनवले होते. तिचं हे जॅकेट अनेक लहान टेडीज एकत्र तयार करण्यात आलं होत. यामध्ये हिरवा, पिवळा, निळा, नारंगी, तपकिरी, राखाडी आणि गुलाबी रंगांचा समावेश आहे. जॅकेटवर दिसणारे हत्ती, ससे, कुत्रे आणि टेडी बेअर्स इतके गोंडस दिसत होते की हा प्रकार मुलांना नक्की आवडेल.

लूक पूर्ण करण्यासाठी उर्फीने स्ट्रॅपी फिकट गुलाबी वेज घातले होते. कानात ड्रॉपडाउन झुमके आणि केसांचे सेंटर पार्टीशन करून एक होऊ बन बांधला होता. मेकअपसाठी, उर्फी हेवी फाउंडेशन, फिकट गुलाबी लिपस्टिक शेड, शार्प कॉन्टोर, मस्करा आणि भुवयांना गोलाकार केले होते.

उर्फीचा हा नवा प्रयोग चाहत्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही आवडला आहे. नेहा धुपियाने तिच्या या व्हायरल व्हिडिओवर कमेंट देखील केली आहे. नेहा धुपियाने लिहिले आहे, आतापर्यंतची सर्वात सुंदर ड्रेसिंग. त्यानंतर दुसऱ्या कमेंटमध्ये अभिनेत्री म्हणाली आहे, मला हे हवे आहे. यावरूनच नेहाने उर्फीच्या या क्युट जॅकेटची मागणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Pune Land Mafia Exposed: घायवळ पुण्यातला लँड माफिया? पोलिसांच्या तपासात कारनामे उघड

Government Apps: तुमच्या फोनमध्ये 'हे' सरकारी अ‍ॅप्स असायलाच हवेत

Maharashtra Politics: भाजपचा नारा; जिथं बळ, तिथं स्वबळ, मराठवाड्यात भाजपला दादांची NCP नको?

Maharashtra Live News Update : - जमिनीतून गुप्तधनाचा हंडा देतो असे सांगत भोंदू बाबाकडून 1 कोटी 87 लाखाची फसवणूक

Bollywood : रक्ताने माखलेला टी-शर्ट... दिग्गज अभिनेत्याच्या मुलाच्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

SCROLL FOR NEXT