Urfi Javed apologized for her behaviour on Tweet Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Post: आता उर्फी बदलणार.. चुकीची झाली जाणीव.. सर्वांची हात जोडून मागितली माफी, म्हणाली...

Urfi Javed Apologized: उर्फीने सोशल मीडियावर माफी मागत तिने स्वतःला बदलणार असल्याचे सांगितले आहे.

Pooja Dange

Urfi Javed's Shocking Announcement: उर्फी जावेद आणि तिच्या स्टाईलने सारेच थक्क होतात. कधी फळांचा तर कधी फोनचा ड्रेस घालून उर्फी तिचे फोटो शेअर करते, परंतु आता उर्फीचा नवा पाहायला मिळणार आहे.

उर्फीने सोशल मीडियावर माफी मागत तिने स्वतःला बदलणार असल्याचे सांगितले आहे. तुमचा यावर विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. उर्फीने स्वतः तिच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी दर वेळी तिच्या कपड्यांवर प्रयोग करत असते. उर्फी दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे ती नेटिझन्सच्या निशाण्यावरही येते आणि लोक तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर अश्लील कमेंट्सही करतात.

आता सोशल मीडियावर उर्फीची आणखी एक नवीन शैली पाहायला मिळाली आहे, ज्याने लोकांना धक्काच बसला आहे. खरं तर, प्रत्येकाच्या अपेक्षांच्या पलीकडे जात उर्फी जावेदने तिच्या ट्विटर हँडलवर माफीनामा पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने परिधान केलेल्या कपड्यांबद्दल लोकांची माफी मागितली आहे.

नेहमी लोकांना धक्का देणार्‍या उर्फी जावेदने नुकताच माफी मागणारा मेसेज लिहून सोशल मीडिया यूजर्सना चकित केले आहे. उर्फीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मी जे परिधान करते त्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागतो. आतापासून तुम्हाला बदललेली उर्फी दिसेल. बदललेल्या कपड्यांसह. माफ करा.

उर्फीने तिच्या या ट्विटनंतर आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिले आहे, 'एप्रिल फूल, मला माहित आहे खूप बालिश आहे.' उर्फीच्या या ट्विटवर नेटकरी कमेंट करत आहेत. काहीजण म्हणत आहेत, आम्हला आधीच माहित होत तू एप्रिल फूल करत आहेस ते. तर काहीजण म्हणणं आहे, तुला कपड्यांची एलर्जी आहे तू कशी बदलशील.

उर्फी जावेदची ही माफी पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. उर्फी हे बोलत आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. उर्फीचे हृदयपरिवर्तन झाले असे काय घडले हे लोकांना समजू शकत नाही. आता अभिनेत्री किती बदलली आहे, हे येणारा काळच सांगेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT