Urfi Javed Share Video Man Misbehaving with her Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Had Bad Experience In Flight : पब्लिक फिगर आहे, पब्लिक प्रॉपर्टी नाही... विमान प्रवासात उर्फी जावेदशी तरुणांनी केले गैरवर्तन

Urfi Javed Share Video: उर्फीने विमानातील व्हिडिओ शेअर करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पुरुषांचा चेहरा उघड केला आहे.

Pooja Dange

Man Misbehave with Urfi Javed In Flight : उर्फी जावेद अभिनेत्री, इन्फ्लुएन्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे. नुकताच उर्फीने मुंबई - गोवा विमान प्रवासातीतील वाईट अनुभव शेअर केला आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत काही पुरुषांनी तिला त्रास दिल्याचे सांगितले आहे.

उर्फीने विमानातील व्हिडिओ शेअर करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पुरुषांचा चेहरा उघड केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने न देखील शेअर केली आहे. उर्फीने या नोटमध्ये लिहिले आहे की, 'काल एका फ्लाईटमध्ये मुंबई ते गोवा प्रवास करताना मला एक वाईट अनुभव आला.

मला खूप त्रास सहन करावा लागला. या व्हिडिओतील पुरुष अश्लील भाषेत काही बोलत आहेत. छेडत होते. वेगवेगळ्या नावांनी हाक देत होते. जेव्हा मी त्यांना टोकले, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्यांचा मित्र नशेत आहे. (Latest Entertainment News)

मद्यधुंद असताना स्त्रियांशी गैरवर्तन करणे हे यामागचे स्पष्टीकरण असू शकत नाही. पब्लिक फिगर आहे, पब्लिक प्रॉपर्टी नाही.' उर्फीने हा व्हिडिओ म्युट करून शेअर केला आहे.

उर्फी नेहमीच चर्चेत असते. ती बिग बॉस आणि स्प्लिट्सविला या रिऍलिटी शोमध्ये दिसली होती. उर्फी तिच्या विच्या आणि डीआयवाय फॅशनची ओळखली जाते. तर उर्फी अनेकदा गरजूंना मदत करताना देखील दिसते.

अलीकडेच, ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत, उर्फीने ती किशोरवयात असतानाच तिचे फोटो पोर्न साइटवर कसे आले याबद्दल सांगितले. "मी 15 वर्षांची असताना, कोणीतरी माझे फोटो एका पॉर्न साइटवर अपलोड केले. तो एक नॉर्मल फोटो होता.

मी माझ्या फेसबुक प्रोफाइलवर ट्यूब टॉप घातलेला फोटो अपलोड केला होता. कोणीतरी तो डाउनलोड केला आणि मॉर्फ न करता, एडिट न करता पॉर्न साइटवर अपलोड केले. हळूहळू, सर्वांना याची माहिती मिळाली.

सगळेजण मला दोष देऊ लागले. मी एक पॉर्न स्टार आहे असे मला लोक बोलू लागले. मी त्यांना विचारलं तुमच्याकडे माझा असा एखादा व्हिडिओ आहे का? पण लोकांनी माझ्यावर 'पॉर्न स्टार'चा मारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT