Saam TV
मनोरंजन बातम्या

Raj Kundra - Urfi Javed: उर्फीसाठी अखेर राज कुंद्राने काढलं मास्क, अभिनेत्री म्हणते - 'हा तर फक्त ट्रेलर...'

Raj - Urfi Video: उर्फी जावेद आणि राज कुंद्राला एकत्र पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

Pooja Dange

Raj Kundra Removes His mark After Ages:

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा नेहमीच चर्चेत असतो. गेली अनेक वर्ष राज कुंद्राने त्याचा चेहरा लपवून फिरतो. परंतु सध्या सोशल मीडियावर त्याने उर्फी जावेदसोबत कोलॅब केले आहे. उर्फी जावेद आणि राज कुंद्रा यांना एकत्र पाहून नेटकरी मात्र हैराण झाले आहेत.

उर्फी आणि राज कुंद्रा यांनी एकत्र एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राज कुंद्राने त्याच्या चेहऱ्यावरील मास्क काढून टाकल्याचे दिसत आहे.

अडल्ट फिल्म कॉंट्रोव्हर्सीमुले राज कुंद्रा वादात अडकला होता. त्यामुळे त्याला जेलमध्ये देखील जावे लागले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा सर्वांपासून त्याचा चेहरा लपवतो आणि त्यासाठी तो विविध मास्कचा वापर करतो.

राज कुंद्रा सगळीकडेच मास्क घालून जातो. त्याने मास्क मॅन म्हणून स्वतःची नवीन ओळखल बनवली आहे. राज कुंद्रा त्याची ओळख पुसण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

उर्फी जावेद आणि राज कुंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही मास्कमध्ये दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये राज कुंद्राने त्याचा मास्क काढला आहे. इतक्या वर्षांनी राज कुंद्राने मास्क का काढला? आणि त्याने उर्फीसोबत कोलॅब का केलं? असे अनेक प्रश्न आता नेटकऱ्यांना पडले आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हा तर फक्त ट्रेलर आहे.' तर राज कुंद्राने 'कधीकधी काहीही न केलेलं बरं' असं म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आहेत. 'दोघेही मास्कमुळे फेमस असलेले हे दोघे एकत्र येत आहेत.' 'काल हे दोघे भांडत होते.' 'दोघे चित्रपटामध्ये दिसणार आहेत वाटतं?' अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

राज कुंद्रा आणि उर्फी जावेद यांच्यात वाद झाला होता. इंस्टग्रामवर स्टोरी पोस्ट करत उर्फीने राज कुंद्राला सुनावले होते. तर राज कुंद्राने देखील उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेंसवर कमेंट केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT