Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फी जावेदने सोडला इस्लाम धर्म, ठेवलं स्वत:चं हिंदू नाव? अभिनेत्रीनेचं सांगितले सत्य

Urfi Javed: असा दावा केला जात आहे की उर्फी जावेद आता मुस्लिम नाही. तिला इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आले आहे. असेही म्हटले जात आहे की उर्फी आता गीता भारद्वाज म्हणून ओळखली जाईल.

Suprim Maskar

Urfi Javed: आपल्या अतरंगी फॅशनमुळे सतत चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. मात्र, यावेळी वाद कपड्यांचा नाही तर धर्माचा आहे. सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी एक व्हिडिओ शेअर करत उर्फी जावेदची इस्लाममधून हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगत उर्फीचा उल्लेख गीता भारद्वाज असा केलाय.

एवढेच नाही तर तिने तिचे नाव गीता भारद्वाज असे देखील बदलले आहे. आता, उर्फीने फैजानचे दावे फेटाळून लावले आहेत आणि त्यांना मूर्खपणाचे म्हटले आहे. उर्फी म्हणाली, "मी स्वतः खूप पूर्वी धर्म सोडला होता. हे लोक हे सर्व का करत आहेत?"

दरम्यान उर्फीच्या इस्लाम धर्मातील हकालपट्टीचा दावा करणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ज्यामुळे 'उर्फीचं धर्मांतर झालं का?' अशा चर्चांना उधाण आलंय. पण या सर्व अफवांवर उर्फीने स्वतं: उत्तर दिलयं मात्र असा कोणताही मौलवी फतवा काढून कुणाला इस्लाम धर्माबाहेर काढू शकत नाही, असा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.

उर्फी आपल्या बोल्ड फॅशन लुकमुळे नेहमीच वादात असते. अशातच आता तिच्या धर्मांतरावरून वाद निर्माण झालाय. स्वतःला नास्तिक म्हणवून घेणाऱ्या उर्फीला इस्लाम धर्मातून बाहेर काढल्याचा दावा फैजान अन्सारी केवळ सोशल मीडियावरील स्वस्त पब्लिसिटीसाठी करतोय का असा सवाल उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT