Urfi Javed New Look  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: समोस्यासारख्या आकाराचे कपडे का घातले? उर्फी विचित्र कपड्यामुळे पु्न्हा ट्रोल

उर्फी जावेदची नवीन स्टाईल पाहावी की खावी, नेटकरी संभ्रमात.

Pooja Dange

Urfi Javed New Video: सोशल मीडिया इंफ्लून्सर आणि अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून उर्फीला ओळख मिळाली. उर्फीने अनेक हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. उर्फी तिच्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. तिचा हा हटके अंदाज जितका तिच्या कपड्यात असतो तितकाच तिच्या बोलण्यातही असतो.

उर्फीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे उर्फीचा एक अतरंगी लूक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. उर्फी तिचे लूक तयार करण्यासाठी काय वापरले याचा नेम नाही. तसेच काहीसे या व्हिडिओमध्ये देखील दिसत आहे.

उर्फीने तिचा या व्हिडिओतील लूक तयार करण्यासाठी त्रिकोणी किंवा समोसाच्या आकाराचा भला मोठा शर्ट घातला आहे. तर त्या शर्टखाली उर्फीने पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. डार्क लाल रंगाची लिपस्टिक लावून तिने लूकला बोल्ड बनविले आहे. उर्फीने या आऊटफिटवर सोनेरी रंगाच्या हाय हिल्स घातल्या आहेत. तसेच ती तिच्या लूकने ती किती कॉन्फिडन्ट आहे हे दाखवत आहे. (Celebrity)

उर्फीने हा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन देखील दिले आहे. उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'काहीतरी वेगळे आकार निर्माण करावे वाटले. हे बनविणे सोपे नव्हते!' उर्फीच्या या व्हिडिओवर अनेक चांगल्या आणि वाईट कमेंट येत आहेत. नेटकरी उर्फीला या लूकमध्ये बघून खुश आहेत. कारण ती या व्हिडिओमध्ये अंग प्रदर्शन करत नाहीये. पण तिच्या ओव्हर साईज समोसाच्या आकाराच्या कपड्यांमुळे ती ट्रोल होत आहे. (Social Media)

उर्फी जावेद नेहमीच काहीतरी विचित्र करत असते. तिच्या फॅशनने अनेकजण थक्क होऊन जातात. तिच्यात हा विश्वास कुठून येतो असा प्रश्न अनेकांना पडतो. उर्फीला कोणी कितीही बोलो ती तिचे काम करत राहते. टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देते. उर्फी तिचे करिअर सेट करण्याचे संपूर्ण प्रयत्न करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगावच्या घटने प्रकरणी उद्या अमरावतीत निषेध सभा

Kolhapur Baba : चुटक्या वाजवत भूत उतरवणाऱ्या भोंदू बाबाला अटक, कोल्हापूर पोलिसांची कारवाई

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT