Urfi javed Google
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फी झाली महादेवाची भक्त; ४०० पायऱ्या चढत गेली शिव मंदिरात!

Urfi Javed New Post: उर्फी जावेद तिच्या अनोख्या फॅशनमुळे अनेकदा चर्चेत असते. पण नवीन वर्षाच्या निमित्ताने अभिनेत्रीचा एक नवीन अंदाज पाहायला मिळत आहे.

Shruti Vilas Kadam

Urfi Javed: टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. उर्फी तिच्या नवीन फॅशन लूकमुळेव्हायरल होत असते. दरम्यान, उर्फीचा नवा फोटो समोर आला आहे. हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

४०० पायऱ्या चढून अभिनेत्री शिव मंदिरात पोहोचली

अलीकडेच उर्फी जावेद ४०० पायऱ्या चढून शिवमंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी गेली होती. तिने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही शेअर केला आहे. समोर आलेल्या या फोटोमध्ये, अभिनेत्री शिवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसतं आहे. यावेळी, अभिनेत्री भारतीय लूकमध्ये खूपच साधी आणि गोंडस दिसत होती. तिने निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे आणि तिचा लूक पूर्ण करण्यासाठी कमीत कमी मेकअप केला आहे. नवीन वर्षात अभिनेत्रीचा हा अंदाज लोकांना आवडतोय.

उर्फी महादेवाच्या भक्तीत मग्न

याशिवाय, उर्फीने फोटो शेअर केले आहेत, ज्यापैकी एका फोटोमध्ये ती मंदिरात हात जोडून महादेवाचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या शिवमंदिरात पोहोचण्यासाठी मी ४०० पायऱ्या चढली आहे.'

एकीकडे अनेक नेटकरी उर्फीची शिवभक्ती पाहून खूप आनंदी आहेत, तर दुसरीकडे काही लोक मुस्लिम असताना मंदिरात गेल्याबद्दल तिला ट्रोल करत आहेत. बरं, ही सर्व ट्रोल्सची मते आहेत, आम्ही अशा कोणत्याही मानसिकतेला प्रोत्साहन देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT