Indias Best Dancer 3 Daily Update Instagram
मनोरंजन बातम्या

Indias Best Dancer 3 Daily Update: जळगावच्या शिवम वानखेडेचा डान्स पाहून आयुष्मानला आली गोविंदाची आठवण; कौतुक करत म्हणाला...

Indias Best Dancer 3 Latest Episode: ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’च्या आगामी एपिसोडमध्ये ‘ड्रीम गर्ल २’च्या टीमने प्रमोशनकरिता हजेरी लावली आहे.

Chetan Bodke

Indias Best Dancer 3 Latest Update

‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’मध्ये ‘ड्रीम गर्ल २’च्या टीमने प्रमोशनकरिता हजेरी लावली आहे. यावेळी प्रमोशननिमित्त शोमध्ये ‘ड्रीम गर्ल २’चे कलाकार आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेने हजेरी लावली होती. ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’च्या शनिवारच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी आपल्या चित्तथरारक नृत्यकौशल्याने परिक्षकांसह आणि उपस्थित कलाकारांचेही त्यांनी लक्ष स्वत:कडे वेधले.

शनिवारच्या एपिसोडमध्ये, स्पर्धक शिवम वानखेडे आणि कोरिओग्राफर वैभव घुगेने ‘गंदी बात’ या गाण्यावर आपल्या डान्सचा जलवा उपस्थितांना दाखवला. शिवमच्या डान्सनंतर आयुष्मान खुरानाने त्याची थेट बॉलिवूड अभिनेता गोविंदासोबत तुलना केली आहे. आयुष्मान खुराना म्हणतो, “आपण कमल हसन सर आणि गोविंदा सरांच्या परफॉर्मन्समधून बॉलिवूड डान्समध्ये कॉमेडीचा मिलाप पाहिलेला आहे. तुझ्या परफॉर्मन्समध्ये जणू गोविंदा सरांची झलक पाहिल्याचा मला भास झाला. तुमच्या दोघांमधील जुगलबंदी लाजवाब होती. तुमची कॉमेडी झक्कास होती, हा खूप मनोरंजन करणारा प्रकार होता.”

अनन्या पांडेनेही त्या शिवमच्या आणि वैभवच्या डान्सचे कौतुक केले. ती म्हणते, “मी बऱ्याच शोमध्ये वैभवचे परफॉर्मन्सेस पाहिले आहेत. तो एक दमदार परफॉर्मर आहे, पण शिवम तर खूपच क्यूट आहे. मला ते गाणे खूप आवडते. जेव्हा डान्सर्सना त्यांच्या सादरीकरणात मजा येत असते ते पाहून मलाही खूप आनंद वाटतो.”

शिवमवर कौतुकाचा वर्षाव करत परिक्षक गीता कपूर म्हणाली, “तुझा परफॉर्मन्स वेगवान असतो, इतकेच नाही तर त्यासोबत तुझे हावभावही पाहण्यासारखे असतात. तुझ्याकडे एक शैली आहे, आणि हा संगम अत्यंत परिपूर्ण आहे. मी जेव्हाही तुला नृत्य करताना बघते तेव्हा आपली पार्श्वभूमी बॉलीवूडची असल्याचा मला अभिमान वाटतो. तू प्रत्येक दिवसागणिक आणखीच उत्तम होत चालला आहेस. तुझा संपूर्ण परफॉर्मन्स अतुलनीय होता.”

कथा उलगडून दाखवत असताना हावभावांची किती गरज असते, यावर भर देत सातत्यपूर्ण नवीन आणि मंत्रमुग्ध करणारे परफॉर्मन्स दिल्ल्याबद्दल सोनाली बेंद्रे यांनीही या जोडगोळीवर स्तुतीसुमने उधळली. त्या म्हणाल्या, “एकदम झकास! वैभव आणि शिवम तुम्ही प्रत्येक आठवड्यात आमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येता. नृत्याचे तंत्र आणि हावभाव हे महत्त्वाचे असतात. ज्या पद्धतीने तुम्ही नृत्याच्या माध्यमातून एखादी गोष्ट व्यक्त होऊन सांगता, ते खूपच थोर आहे. तुमच्या जोडीसाठी माझ्या मनात खूप आदर आहे. हॅट्स ऑफ.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT