Urfi Javed Invite cancel from Madhuri Dixit's guest list Saam TV
मनोरंजन बातम्या

Uorfi Javed Post For GEA 2023: माधुरी दीक्षितमुळे ऐनवेळी उर्फीला इव्हेंटमधून बाहेर काढले; पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप

Madhuri Dixit's guest list: ‘ग्लोबल एक्सिलेंस अवॉर्ड्स 2023’ (GEA 2023) प्रमुख पाहुणी माधुरी दीक्षित होती.

Pooja Dange

Uorfi Javed on being uninvited In GEA 2023: टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिचे कपडे, तिचा फॅशन सेन्स आणि तिच्या वक्तव्यांमुळे उर्फी ट्रोलसच्या निशाणावर असते. उर्फीच्या कपड्यांची आणि आत्मविश्वासाचे काही कलाकार कौतुक करतात. परंतु कधी कधी तिला तिच्या या फॅशन सेन्समुळे अपमान देखील सहन करावा लागतो. नुकतीच उर्फीने पोस्ट करत तिच्या एक अनुभव शेअर केला आहे.

काल जीइअ २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक तारे-तारकांनी उपस्थिती लावली होती. उर्फीचे म्हणणे आहे की तिला देखील या सोहळ्याला बोलविण्यात आले होते.

यासाठी उर्फीने तिचे सर्व प्लॅन कॅन्सल केले होते. तसेच सर्व तयारी देखील केली होती. परंतु ऐनवेळी आयोजकांनी तिला कार्यक्रमाला येऊ नको असे सांगण्यात आले. तसेच आयोजकांनी याचे कारण माधुरी दीक्षित असल्याचे देखील सांगितले. (Latest Entertainment News)

यावर राग व्यक्त करत उर्फीने पोस्ट केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ पोस्ट करत उर्फीने तिचे म्हणणे व्यक्त केले आहे. उर्फीने तिच्या पोस्टवर लिहिले आहे, 'या इव्हेंटची मजेदार गोष्ट- त्यांनी माझ्या टीमशी संपर्क साधला, मला आमंत्रित केले, मी आमंत्रण स्वीकारले, माझे सर्व प्लॅन कॅन्सल केले, माझे आऊटफिट देखील सिलेक्ट केले होते, शेवटच्या क्षणी त्यांनी माझ्या टीमला सांगितले की मी आता आमंत्रित नाही.

आम्ही कारण विचारले तेव्हा आयोजक म्हणाले की मी माधुरी दीक्षितच्या पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट नाही (काय विचित्र कारण आहे). भावा, मी कुठे या इव्हेंटला यायला मरत नाही, पण शेवटच्या क्षणी कोणाला तरी न येण्यास सांगणे वाईट आहे. थोडी हिंमत दाखवा किंवा माझ्याकडून कारण शिकून घ्या.

Urfi Javed Instagram Story

‘ग्लोबल एक्सिलेंस अवॉर्ड्स 2023’ (GEA 2023) प्रमुख पाहुणी माधुरी दीक्षित होती. उर्फी तिच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे तिला खूपच वाईट वाटले आणि तिचा राग तिने व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT