Anupama Serial Update Saam tv
मनोरंजन बातम्या

Anupama Serial Update: लग्नाच्या वाढदिवसाला अनुपमा-अनुजची भेट होणार; मालमत्ता हडपण्यासाठी बरखा आखणार नवी चाल, मालिकेत नवा ट्विस्ट

Anupama Serial Update: रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांच्या टीव्ही शोमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

Anupama Serial Update: रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांच्या टीव्ही शोमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अनुपमाची भूमिका ही रुपाली गांगुली साकारत आहे. तर गौरव खन्ना हा शोमध्ये अनुज कपाडियाची भूमिका साकारत आहे. या टीव्ही शोमध्ये आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

'अनुपमा'च्या मालिकेत अनुपमा आणि अनुज वेगळे झाले आहेत. अनुज आणि छोटी अनु खरी आई मायासोबत राहत आहे. तर अनुपमा तिच्या आईकडे गेली आहे. अनुपमाने तेथे तरुणींना डान्स (Dance) प्रशिक्षणाची अकादमी सुरू केली आहे. अनुज हा अनुपमाला तरुणींना डान्स शिकवताना पाहतो. अनुपमालाही अनुज आसपास असल्याचा भास होतो. परंतु अनुपमाला अनुजला दिसतच नाही.

मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनुपमा आणि अनुजच्या भेटीचा ट्रॅक सुरू आहे. परंतु अद्याप भेट झालेली नाही. याचदरम्यान या मालिकेचा नवा प्रोमो आला आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, 'अनुपमा आणि अनुज यांची लवकरच भेट होणार आहे. अनुपमाने तिच्या आईला अनुजच्या भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. अनुज आणि अनुपमा दोघे लग्नाच्या वाढदिवसादिवसाला एकमेकांना भेटणार आहेत'.

रिपोर्टनुसार, अनुज आणि अनुपमाची भेट होईल, अनुज पुन्हा अनुपमावर आरोप करेल आणि तिचा अपमान करेल. मात्र, यावेळी अनुपमा गप्प बसणार नाही. ती अनुजला चोख उत्तर देईल, असे म्हटले जात आहे. पुढच्या एपिसोडमध्ये असे पाहायला मिळेल की, बरखाच्या बोलण्यावरून एक कर्मचारी अनुपमाला कॉल करेल . तिला अनुजच्या भेटीची चुकीची वेळ सांगेल. त्यामुळे अनुपमा आणि अनुजची भेट होणार नाही.

तसेच ऑफिसची बैठक रद्द झाल्याने दोघांची तिथेच भेट होईल. तेव्हा पाखी अनुपमाला सांगेल की, बरखाला मालमत्ता हडपायची आहे. अनुपमा ऑफिसमध्ये पोहोचेल, तेव्हा बरखा तिला पॉवर ऑफ अटॉर्नीवर सही करायला सांगेल.

तेव्हा बरखा अनुपमाला सांगेल की, तू आता कपाडिया कुटुंबाची सदस्य नाही. मात्र, तेव्हा अनुपमा सही करण्यास नकार देईल. अनुपमा तेव्हा बरखाला सांगेल की, अनुज आणि मी केवळ वेगळे झालो आहोत. आमचा घटस्फोट झालेला नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT