Anuj Will Leave the Show Instagram @anupama_show_1
मनोरंजन बातम्या

Anupama Update: अनुज 'अनुपमा'सोडणार? मालिकेत येणार नवीन ट्विस्ट

Anupama Show: मालिकेच्या नवीन ट्रॅकमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Pooja Dange

Anupama And Anuj Will Get Separate: टीव्ही जातात अनुपम ही मालिका खूप प्रसिद्ध आहे. या मालिकेतील कलाकार रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांना त्याच्या खऱ्या नावापेक्षा चाहते अनुपमा आणि अनुज या नावांनीच जास्त ओळखतात.

या दोन्ही स्टार्सनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असले तरी स्टार प्लसवर सुरु असलेल्या या मालिकेला चाहते प्रचंड प्रेम करत आहेत. 'अनुपमा' बराच काळ टॉप टीआरपी असलेली मालिका आहे. अनुपमा आणि अनुजच्या जोडीवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. अनुपमामधील या जोडीच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे.

रुपाली गांगुली स्टारर 'अनुपमा' मधील अनुज म्हणजेच गौरव खन्ना लवकरच मालिका सोडून जाणार आहे. मालिकेच्या नवीन ट्रॅकमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सध्या मालिकेत असे दाखविण्यात येत आहे की, अनुपमा तिच्या आयुष्यात नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असताना अनुज त्याच्या मुलीसोबत मुंबईत राहत आहे. 'अनुपमा' मालिकेतील सध्या ते सीन बघून प्रेक्षक वेगवेगळे तर्क लावत आहेत. प्रेक्षकांना असे वाटू लागले आहे की लवकरच निर्माते गौरव खन्नाला मालिकेतून बाहेर काढून टाकतील आणि संपूर्ण शो अनुपमावर केंद्रित करतील.

गौरव खन्ना खरंच शो सोडतोय का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत? 'अनुपमा'चा अनुज शोमधून कुठेही जात नाहीये. टेलिचक्करच्या वृत्तात, अभिनेत्याशी संबंधित एका सूत्राने सांगितले की तो मालिका सोडत नाही आणि पुढेही 'अनुपमा'चा भाग राहील. त्याचा अभिनय चाहत्यांना खूप आवडत आहे.

गौरव खन्ना त्याच्या खऱ्या पत्नीसह स्टार प्लसच्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे तो शो सुरू ठेवू शकणार नाही आणि यामुळेच निर्माते कथेत ट्विस्ट आणत आहेत. अद्याप निर्मात्यांकडून किंवा अभिनेत्याकडून कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT