Tunisha Sharma Instagram @_tunisha.sharma_
मनोरंजन बातम्या

Tunisha Sharma: टुनिशा शर्माच्या अंत्य संस्काराला उशीर का होतोय? काय आहे नेमकं कारण?

टुनिशा शर्मावर अंत्यसंस्कार केव्हा, कुठे आणि कोणत्या वेळी होणार, याबाबत कुटुंबाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Pooja Dange

Tunisha Sharma Funeral: बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारी अभिनेत्री टुनिशा शर्माने २४ डिसेंबर, २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर सहकलाकार शीझान मोहम्मद खानच्या मेकअप रूममध्ये तिने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या निधनानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

20 वर्षीय अभिनेत्री टुनिशा शर्माच्या मृत्यूनंतर पोलीस या संदर्भात तिचे कुटुंबीय, मालिकेशी संबंधित लोक आणि तिचा कथित प्रियकर अभिनेता शीजानची चौकशी करत आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार अभिनेत्रीच्या पोस्टमॉर्टम अहवालानंतर, 27 तारखेला तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

27 डिसेंबर 2022 रोजी टुनिशावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माध्यमांच्या हाती आलेल्या बातमीनुसार टुनिशाचे कुटुंब तिची मावशी मुंबईला येण्याची वाट पाहत आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर, तिची मावशी 26 डिसेंबरलाच मुंबईला पोहोचणार होती. परंतु ख्रिसमसच्या असल्यामुळे त्या मुंबईला पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे 26 डिसेंबर 2022 रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत.

अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार केव्हा, कुठे आणि कोणत्या वेळी होणार, याबाबत कुटुंबाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच टुनिशाचा मृतदेह अद्याप तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देणार आलेला नाही. वसई पोलीस अजून जे जे रुग्णालयात पोहचले पोहचले नसल्याने टूनिशाचा मृतदेह ताब्यात घेण्यात तिच्या कुटुंबियांना वेळ लागत आहे. या सगळ्या प्रक्रयासाठी अजून एक ते दीड तास लागू शकतो

माध्यमांशी बोलताना टुनिशा शर्माचा मित्र आणि तिच्यासोबत काम करणारा कंवर ढिल्लोन म्हणाला की, त्याने टुनिशासोबत अल्प काळासाठी काम केले, पण ती त्याच्यासाठी कुटुंबासारखी होती. काही काळापासून ती चिंता आणि नैराश्यातून जात असल्याचेही तिने सांगितले. आपल्या मैत्रिणीविषयी बोलताना कंवर भावूक झाला आणि म्हणाले, 'लोक जोपर्यंत त्यांच्याकडून काहीतरी काढून घेत नाहीत तोपर्यंत दुस-याचे दुःख समजू शकत नाही.

टुनिशा शर्माच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने सलमान खानच्या दबंग 3 चित्रपट काम केले आहे. तसेच कतरिना कैफच्या फितूर आणि बार बार देखो या चित्रपटातही तिने काम केले आहे. 'इंटरनेट वाला लव्ह' मधून तिला टेलिव्हिजनवर ओळख मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT