Hina Khan Breast Cancer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hina Khan : हिना खानला होतायत असह्य वेदना... थेट देवाला दिली हाक

Hina Khan Post : हिना ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजला आहे. आपल्या कॅन्सरविषयी सगळे अपडेटस् ती सोशल मिडियावर देत असते. आता तिच्या एका स्टेटमुळे ती पुन्हा चर्चेत आलीये.

Shweta Joshi

'ये रिश्ता क्या कहलता है' या सिरियल मधून घराघरात पोहोचलेली हिना खान सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे. आपल्या आजारविषयी नुकतचं तिने सोशल मिडियावर जाहीर केलं आणि तिच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वाला धक्का बसला. हिना ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजला आहे. आपल्या कॅन्सरविषयी सगळे अपडेटस् ती सोशल मिडियावर देत असते. आता तिच्या एका स्टेटमुळे ती पुन्हा चर्चेत आलीये.

हार न मानता कॅन्सरशी झुंज देण्याचं अभिनेत्री हिना खानने आता ठरवलयं. मात्र तिला उपचारादरम्यान असह्य त्रास होतोय. यासाठी तिने अल्लाहकडेच आता मदत मागितली आहे. ' अल्लाहशिवाय कुणीही हा त्रास दुर करु शकत नाही' असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्यात.

हिना खानची ही पोस्ट सध्या सोशल मिडिया वर चांगलीच ट्रेंड करत आहे. अशा वेळी तिच्या चाहत्यांनी तिला कमेंटच्या माध्यामातून धीर देण्याचा प्रयत्न केलाय. 'सगळं काही ठिक होईल', ' तु तुझ्या पापांची स्ट्रॉंग मुलगी आहेस ना' तर कुणी 'आम्ही तुझ्या सोबत आहोत, काळजी नको करु' अशा कमेंटस् केल्यात.

Hina Khan Post

हिना आधीपासूनच सोशल मिडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. आता कॅन्सरशी तिचा सुरु असलेल्या लढा ती सोशल मिडियावर व्हिडिओ, फोटोज् च्या माध्यमातून शेअर करत असते. त्यासोबतच हिना ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती करताना पाहायला मिळते. जसे की तिला तिच्या कॅन्सर विषयी कसं कळलं, लक्षणे काय होती यातून तिने स्वत: ला कसे सावरले. याविषयी ती अनेकदा बोलत असते. तिच्या पहिल्या केमोथेरपीनंतरचा अनुभव तिने सोशल मिडियावर शेअर केला होता. केमोथेरपी नंतर तिच्या अंगावर झालेल्या जखमांचे फोटोज् देखील तिने शेअर केले होते.

हिना खानने कॅन्सर झाल्यामुळे आपण केस कापण्याचा निणर्य घेतला. केस गळून जाण्यापेक्षा आपण केस कापूयात, माझी ताकद आणि माझे प्रेम माझ्या स्वत:वर आहे असा विचार केल्याचं तिने म्हणलं. आणि केस कापतानाचा व्हिडिओही सोशल मिडियावर शेअर केला होता. तिचे सुंदर लांब सडक केस कापताना तिच्या आईला अश्रू अनावर झाले होते. मात्र हिनाने न घाबरता कॅन्सरशी लढा देणार असल्याचं आत्मविश्वासाने स्पष्ट केलं. तिचा तो व्हिडिओ पाहून नेटकरीही खूप इमोशनल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT