Anita Hassanandani SAAM TV
मनोरंजन बातम्या

Anita Hassanandani : तो आमच्यासमोर पॅन्ट काढायचा...अनिता हसनंदानीने शेअर केला लहानपणीचा भयानक किस्सा

Anita Hassanandani Revealed School Time Scary Story : टिव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी हीने आपल्यासोबत लहानपणी घडलेला एक किस्सा सांगितला आहे. ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

Shreya Maskar

टीव्ही स्टार अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) हीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने अनेक हिट मालिका केल्या आहेत. सध्या ती सुमन इंदोरी या शोमधून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. अनिता हसनंदानीला 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळाली. अनिता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आपल्या विविध लूकचे फोटो ती शेअर करते.

अनिता हसनंदानीने एका मिडिया मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. ज्यात ती 9 किंवा 10 वर्षांची असताना तिला विनयभंगाच्या घटनेला सामोरे जावे लागले होते. यावेळी ती शाळेत होती.

अनिता हसनंदानीने सांगितलेला किस्सा असा आहे की, शाळेत असताना तिच्यासोबत एक विनयभंगाची घटना घडली होती. ती म्हणाली, आम्ही शाळेत जाताना रिक्षाने जायचो. आई रिक्षासाठी 10 रुपये द्यायची तर शाळेतून परत येताना आम्ही पायी यायचो. आम्ही समोसे किंवा कॅन्टीनमध्ये काहीतरी खायला पैसे वाचवायचो आणि घरी पायी जायचो. जेव्हा आम्ही पायी जायचो तेव्हा तेथे एक रिक्षावाला असायचा.

"एक रिक्षाचालक पॅन्ट खाली उतरवून आम्हाला घाण नजरेने पाहायचा आणि स्वतःला स्पर्श करू लागायचा" असे तो नेहमी करायचा. त्यानंतर अभिनेत्रीने आपल्या शाळेचा रस्ता बदलला. तरी तिला भीती होती की ड्रायव्हर अजूनही तिचा पाठलाग करेल. अभिनेत्री पुढे म्हणाली की, "त्याला रस्ता माहित होता आणि त्याच्याकडे रिक्षाही होती, त्यामुळे शाळेच्या आजूबाजूला रिक्षा आली की आम्ही घाबरायचो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Fort : वीकेंडला कुठे फिरायला जाल? कर्जतजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

SCROLL FOR NEXT