Shoaib Ibrahim SAAM TV
मनोरंजन बातम्या

टीव्ही स्टार 'Shoaib Ibrahim'ला कपडे इस्त्री करण्यासाठी मिळायचे २ रुपये, स्वतः सांगितला आयुष्यातील 'तो' प्रसंग

Shoaib Ibrahim : टिव्ही अभिनेता शोएब इब्राहिमने आपल्या जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. तो नेमकं काय बोलला जाणून घ्या.

Shreya Maskar

शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) आणि दीपिका कक्कर (Dipika Kakar) हे टिव्हीचे गाजलेले कपल आहे. हे दोघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. या जोडप्याचा मोठा चाहता वर्ग आहे. हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

दीपिका आणि शोएबने त्यांच्या एका व्लॉगमध्ये त्यांच्या जीवनातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या व्लॉगमध्ये अभिनेता शोएब इब्राहिम कपड्यांना इस्त्री करताना दिसत आहे. तेव्हा त्यांनी आपला एक जुना किस्सा सांगितला आहे. ज्यात शोएब वडिलांचे कपडे इस्त्री करायचा आणि त्याला त्याबद्दल पैसे मिळायचे. शोएबने सांगितले की, "मी लहानपणी कपडे फोल्ड करायचो तेव्हा बाबा मला दोन रुपये द्यायचे. जेव्हा मी चौथी-पाचवीला गेलो तेव्हा कपड्यांना इस्त्री करायला लागलो. तेव्हा त्या बदल्यात त्यांना वडील मला 2 रुपये द्यायचे. मी आठवड्यातून तीन दिवस वडिलांचे कपडे इस्त्री करून 6 रुपये मिळवायचो."

दीपिका कक्करही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत बोलते की, आम्हाला पॉकेटमनी म्हणून 2,5,10 रुपये मिळायचे. शोएब लहानपणी खूप काटकसरीने जगला आहे. शोएबने पुढे सांगितले की, "मी लहानपणी दूध घेण्यासाठी धावायचो. कारण दुधाचे 50 पैसे किंवा 1 रुपया मिळायचा. जो मी साठवायचो आणि पैसे वाचवून पाणीपुरी खायचो. या जुन्या दिवसांत मी भोपाळला 1 रुपयात राहायचो."

शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांनी अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. चाहत्यांना यांचा अभिनय खूप आवडतो.दीपिका कक्कर ही 'बिग बॉस 12' ची विजेता देखील राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT