Barun Sobti blessed with Baby Boy Instagram @barunsobti_says
मनोरंजन बातम्या

TV Actor Blessed With Second Child: असुर फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा

Barun Sobti blessed with Baby Boy: बरुण सोबती आणि पश्मीन मनचंदा यांना मुलगा झाला आहे.

Pooja Dange

TV actor Barun Sobti blessed with second child: 'इस प्यार को क्या नाम दूँ' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता बरुन सोबती आणि त्याची पत्नी पश्मीन मनचंदा याच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. बरुन आणि पश्मीन या दोघांना मुलगा झाला आहे. यापूर्वी 2019 मध्ये दोघांना मुलगी झाली होती. बरुण सोबती टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लाडक्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. तो गेल्या काही काळापासून टीव्हीपासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो.

बरुण सोबती सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना अपडेट्स देत असतो. बरुन आणि पश्मीन यांना ४ वर्षाची मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव सिफत असे आहे. तर बरुण सोबती आणि पश्मीन मनचंदा यांना आता मुलगा झाला आहे.

दोघांनीही सोशल मीडियावर प्रेग्नेंसीविषयी काहीच सांगितले नव्हते. पण बरुण आणि पश्मीन अलीकडेच दलजीत कौरच्या लग्नात सहभागी झाले होते. यावेळी दोघेही लवकरच आई-वडील होणार असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला होता.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बरुन याने तो वडील झाल्याचे सांगितले. तो म्हणाला की, मी पुन्हा एकदा बाबा झालो आहे. बरुनची पत्नी त्याची बालपणीची मैत्रिण आहे. दोघेही एकमेकांना शाळेपासून ओळखतात. खूप वर्षाच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी 12 डिसेंबर 2010 रोजी गुरुद्वारामध्ये लग्न केले. यानंतर 2019 मध्ये दोघांना मुलगी झाली. बरुण आणि पश्मीनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इस प्यार को क्या नाम दूं व्यतिरिक्त, बरुण सोबती, दिल मिल गये, बात हमारी पक्की है यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने तनहाइयां, असुर यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. त्यांच्या भूमिकांना चांगलीच पसंती मिळाली आहे.

बरुनने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. त्याची स्टाइल चाहत्यांना आवडते. बरुण सोबती लवकरच अनेक शो आणि मालिकांमध्ये दिसणार आहे. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांशी संवादही साधतो. त्याच्या चाहते त्याला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ‘आनंदकुंभ’ संत संमेलन; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत-महंतांचे पूजन

Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपसोडून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार का? नाना पटोलेंच्या वक्तव्याने विषय संपला

Mumbai : मुंबई लोकलमध्ये पॉवर बँकचा अचानक स्फोट! बॅगला आग लागल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण

Island Forts : चारही बाजूंनी पाणी अन्...; बेटांवर असलेले जगातील ७ रहस्यमय किल्ले, भव्यता पाहून व्हाल थक्क

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ; PHOTO शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का, नवरा आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT