Tuja Maja Sapan new marathi serial  Instagram @sonymarathi
मनोरंजन बातम्या

New Marathi Serial: वीरूच्या डोळ्यांतलं स्वप्न प्राजक्ता टिपणार ; 'तुजं माजं सपान' नवी मालिका लवकरच येणार भेटीला

New Serial On Sony Marathi: सोनी मराठी या वाहिनीची कुस्तीवर आधारित 'तुजं माजं सपान' ही मालिका १९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tuja Maja Sapan New Marathi Serial: सोनी मराठी या वाहिनीवर विविध विषय असलेल्या मालिका आपल्याला पाहायला मिळतात. सोनी मराठी असाच एक वेगळा विषय घेणं आपल्या भेटीला येत आहे. कुस्तीवर आधारित ही नवीन मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे.

कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. सोनी मराठी या वाहिनीची कुस्तीवर आधारित 'तुजं माजं सपान' ही मालिका १९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तुजं माजं सपान' या मालिकेचा प्रोमो सोनी मराठी या वाहिनीने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. मालिकेत नायक आणि नायिका दोघेही कुस्तीपटू आहेत. (Latest Entertainment News)

प्रोमोमध्ये नायिका प्राजक्ता आपल्या नवऱ्याचा कुस्तीच्या कपड्यातील फोटो पाहताना दिसत आहे. त्याला कुस्ती खेळताना आठवताना दिसते. त्यांच्या या कुस्तीने मात्र त्यांच्या कुटुंबाची वाट लावली आहे. असं नायक म्हणजेच वीरेंद्रच्या बोलण्यातून कळत आहे. "या कुस्तीपायी आपल्या घराण्याचा विस्कोट झालायं" हा डायलॉग वीरेंद्र बोलताना दिसतो. प्रेश्रकांच्या मनात बरीच कोडी निर्माण करणाऱ्या या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे.

'तुजं माजं सपान' मालिकेत प्राजक्ता नवऱ्याच्या स्वप्नासाठी काय पाऊन उचलणार हे पाहणं फारचं रंजक ठरणार आहे. त्यांच्यात नक्की काय झालं ? वीरेंद्र-प्राजक्ताच्या आयुष्यात कुस्तीने असं कोणतं वादळ आणलं? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. या मालिकेतील 'तुजं सपान ते माजं सपानं' हा डायलॉग खूप फेमस होताना दिसत आहे.

'तुजं माजं सपान' या मालिकेची निर्मिती लेखन सचिन मोटे यांनी केलं आहे. सचिन मोटे सुप्रसिद्ध मालिका महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक आहेत.

सोनी मराठी या वाहीनीवर 'ज्ञानेश्वर माउली', 'जीवाची होतिया काहिली', 'गाथा नवनाथांची', 'आशिर्वाद एकवीरा आईचा' या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सोनी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही बंद झाली असून त्या वेळेत आता 'कोण होणार करोडपती' मालिका प्रक्षेपित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT