बंटी और बबलीचा 2 चा ट्रेलर प्रदर्शित; 'हा' अभिनेता साकारणार बंटीची भूमिका S
मनोरंजन बातम्या

बंटी और बबलीचा 2 चा ट्रेलर प्रदर्शित; 'हा' अभिनेता साकारणार बंटीची भूमिका

चित्रपट 19 नोव्‍हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या बंटी और बबली चित्रपटानंतर आता 'बंटी आणि बबली 2' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. 'बंटी और बबली 2' मधील कलाकारांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी आणि सैफ आली खान सोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सिद्धांत चतुर्वेदीने याआधी 'गल्‍ली बॉय' मधील एमसी शेरच्‍या भूमिकेत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आता तो पहिल्‍यांदाच यश राज फिल्‍म्‍सचा बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपट 'बंटी और बबली 2' मध्‍ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

चित्रपटात बबली ही तंत्रज्ञान प्रेमी असणार आहे. तिला डिजिटल आविष्‍काराची ओळख आहे. फसवणूक करण्‍यासाठी अत्‍यंत कुशल आणि सक्षम आहे. या चित्रपटामध्‍ये मूळ बंटी आणि बबलीच्‍या भूमिकेत सैफ अली खान आणि राणी मुखर्जी झळकणार आहे. हा चित्रपट पिढ्यांमधील चढाओढ दाखवतो, जेथे खऱ्या बंटी-बबलीचा नवीन बंटी बबलीशी सामना होतो आणि पुढे कथानकला एक वेगळे वळण मिळते.

तर सैफ आणि राणी यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्साहित आहेत. यापूर्वी या दोघांनी ‘हम तुम’,‘तारा रम पम’, ‘थोडा प्यार थोडा प्यार थोडा जादू’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हा चित्रपट 19 नोव्‍हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'बंटी और बबली 2'चे दिग्‍दर्शन वरूण व्‍ही. शर्मा यांनी केले आहे. याआधी त्यांनी YRF चे सर्वात मोठे ब्‍लॉकबस्‍टर्स 'सुल्‍तान' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटामध्‍ये सहाय्यक दिग्‍दर्शक म्‍हणून काम केले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT