Actor Surya's Fan Death News Instagram @actorsuriya
मनोरंजन बातम्या

Surya Fan Dies: सूर्या सिंघमच्या वाढदिवसाला गालबोट; बॅनर लावताना चाहत्याच्या गेला जीव, नेमकं काय घडलं?

Surya Birthday News: आपल्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करताना त्याच्या दोन फॅन्सच्या मृत्यु झाला.

Chetan Bodke

Actor Surya's Fan Death News:

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्याचा काल वाढदिवस झाला. अभिनेत्याने आपल्या चाहत्यांसोबत ४८ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करताना त्याच्या दोन फॅन्सच्या मृत्यु झाला. आंध्रप्रदेशातील पालनाडू जिल्ह्यात सुर्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावताना शॉक लागून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्का व्यंकटेश आणि पोलुरी साई असे विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या चाहत्यांचे नाव आहे. पालनाडू जिल्ह्यातील मोपुलावरीपालम गावात विजेच्या धक्क्याने या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघेही वाढदिवसाचे बॅनर लावताना फ्लॅक्सचा लोखंडी रॉड आणि इलेक्ट्रिक ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने ही घटना घडली. यामध्ये त्या दोन्हीही चाहत्यांचा जागीच मृत्यू झालाय.

पुढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्याचे चाहते, नरसरावपेठ येथील एका प्रायव्हेट पदवी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण होते. त्यांचे पार्थिव नरसरावपेठ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलुरी साईची बहीण अनन्याने तिच्या भावाच्या मृत्यूसाठी कॉलेजला जबाबदार धरले.

पोलुरी साईची बहिण अनन्या म्हणते, ‘माझ्या भावाच्या मृत्यूसाठी कॉलेजच जबाबदार आहे. आम्ही कॉलेजमध्ये भरमसाठ फी भरतो. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना, महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि देखरेख केली जाईल, याचे आश्वासन दिले होते. पण कॉलेज, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि देखरेख करत नाही. आम्ही रोजगार करत आमच्या विद्यार्थ्यांची फी भरतो, फी भरण्यासाठी आम्हाला फार संघर्ष करावा लागतो. भावाच्या चांगल्या आयुष्याकरिता आम्ही धडपड करत होतो, नेमकं त्याचवेळी ही घटना घडली.’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

Maharashtra News Live Update: राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून बाळराजे आवारे पाटील यांना अटक

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

SCROLL FOR NEXT