Junior Balaiah Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Junior Balaiah Death: टॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचा गुदमरून मृत्यू, नेमकं काय घडलं?

Tamil Actor Junior Balaia: ७० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Priya More

Junior Balaiah Passed Away:

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून (South Film Industry) आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम अभिनेत्री रंजुषा मेननच्या (Renjusha Menon) निधनानंतर अभिनेत्री डॉ. प्रियाचे (Dr Priya) निधन झाले. या दु:खातून सावरत नाही तोवर टॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता रघु बलैया उर्फ ज्युनिअर बलैया यांचे निधन (Junior Balaiah Death) झाले आहे.

या अभिनेत्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ७० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ज्युनिअर बलैया यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी श्रद्धांजली वाहत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडिया टूडेने दिलेल्या माहितीनुसार, तमिळ अभिनेते ज्युनियर बलैया यांचे चेन्नई येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. जुनिअर बलैया हे दिवंगत दिग्गज अभिनेते टीएस बलैया यांचे चिरंजीव होते. आज संध्याकाळी अभिनेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

ज्युनिअर बलैया यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेलनाट्टू मारुमागल' या चित्रपटातून केली. 'करागट्टकरन', 'सुंदरा कंदम', 'विजेता' आणि 'सत्ताई' या चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. ज्युनिअर बलैया यांनी फक्च चित्रपटच नाही तर टीव्ही शोमध्ये देखील काम केले आहे. 'वाजकई' और 'चिन्ना पापा पेरिया पापा' या शोमध्ये ते सहभागी झाले होते.

28 जून 1953 रोजी जन्मलेल्या ज्युनियर बलैयाने चित्रपटांपूर्वी काही नाटकांमध्ये काम केले होते. ज्युनिअर बलैया हे शेवटी 'येनंगा सर उंगा सत्तम' या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT