Salaar 4th Day Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Salaar 4th Day Collection: प्रभासचा ‘सालार’ वर्ल्डवाईड सुसाट, लवकरच ५०० कोटींचा टप्पा गाठणार

Salaar Box Office Collection: प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. भारतासह परदेशातही चित्रपटाने जोरदार कमाई करत आपल्या नावावर नवे रेकॉर्ड रचले आहेत.

Chetan Bodke

Salaar 4th Day Box Office Collection

प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. भारतासह परदेशातही चित्रपटाने जोरदार कमाई करत आपल्या नावावर नवे रेकॉर्ड रचले आहेत. प्रदर्शनाच्या आधीपासूनच चित्रपटाची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा आहे.

रिलीजच्या चार दिवसांमध्ये चित्रपटाने २५० कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रभासच्या 'सालार'ला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस चित्रपटाची क्रेझ वाढतच आहे. चला जाणून घेऊया, चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आलेख... (Tollywood)

२२ डिसेंबरला जगभरामध्ये प्रदर्शित झालेला ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ हा चित्रपट तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन ही स्टारकास्ट दिसणार आहे. या व्यतिरिक्त श्रृती हासन, बॉबी सिम्हा आणि जगपती बाबू हे कलाकारही दिसणार आहेत. (Actor)

सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ११२ कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी ५६. ३५ कोटींची कमाई, तिसऱ्या दिवशी ६१ कोटींची कमाई, तर चौथ्या दिवशी चित्रपटाने ४२. ५० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटामध्ये, प्रभासच्या अभिनयाचे जितके कौतुक झाले, तितकंच त्याला ट्रोलही केलं. चार दिवसांमध्ये चित्रपटाने एकूण २५१. ६० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने चार दिवसांत ४०२ कोटींची कमाई केली आहे. (Bollywood Film)

‘सालार पार्ट 1: सीझफायर’च्या रिलीजच्या एक दिवस आधी, शाहरुख खानचा 'डंकी' थिएटरमध्ये रिलीज झाला. ॲडव्हान्स बुकिंग दरम्यान दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. सोशल मीडियावर दोन्ही चित्रपटांची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. पण या सर्वामध्ये प्रभासच्या ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ने बाजी मारली. ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ चित्रपट २०२३ मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. रिलीजनंतर चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

SCROLL FOR NEXT