Hi Nanna Telugu Film Official Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Hi Nanna Poster: साऊथ सुपरस्टार आणि मृणालची नव्या चित्रपटात दिसणार लव्हकेमिस्ट्री, पहिला पोस्टर प्रदर्शित

Mrunal Thakur And Nani New Film: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार नानी लवकरच एका नव्या चित्रपटातून झळकणार आहे.

Chetan Bodke

Hi Nanna Official Poster: तेलुगू स्टारर अभिनेता घंटा नवीन बाबू उर्फ नानी नेहमीच आपल्या अभिनयामुळे भारतात प्रसिद्ध आहे. केवळ दक्षिण भारतातच नाही तर भारतातील इतर भागातही अभिनेत्याची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम आहे. नानीचे चाहते नेहमीच त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याचा ‘दसरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे अभिनेत्याचा लूक आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांना फारच भावला. नानी नेहमीच त्याच्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो. यावेळी देखील अभिनेता त्याच्या चित्रपटामुळेच चर्चेत आला आहे. नानीचा लवकरच येत्या काही दिवसात आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच त्या चित्रपटातील अभिनेत्याचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. अनेकदा या चित्रपटाचे नाव चाहते ‘नानी ३०’ असे समजत होते. पण या चित्रपटाचे नाव ‘हाय नन्ना’ (Hi Nanna) असं चित्रपटाचे नाव आहे. नानीसोबत चित्रपटात प्रमुख भूमिकेत मृणाल ठाकूर देखील दिसणार आहे. नुकतंच निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केला असून प्रेक्षकांना चित्रपटाची फारच उत्सुकता लागली आहे. शौर्युव दिग्दर्शित ‘हाय नन्ना’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला एकूण पाच भाषांमध्ये येणार आहे. सध्या नानी आणि मृणाल हे दोघेही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून हैदराबाद आणि भारताच्या इतर भागात चित्रपटाचे शूटिंग जोरदार सुरू आहे.

नानी आणि मृणाल ठाकूर ‘हाय नन्ना’ मध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 2023मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे. १३ जुलै रोजी अर्थात काल नानी, मृणाल आणि एक लहान मुलगी असलेली चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. ‘हाय नन्ना’ च्या निर्मात्यांसह चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर चित्रपटाचं नाव आणि फर्स्ट लुक शेअर केला आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना दिग्दर्शकाने कॅप्शन दिले की, ‘ती म्हणते ‘हाय नन्ना’ आणि तू माझ्या उर्वरित क्षणांची मॅजिक आहेस.’ असं कॅप्शन दिलं.

‘हाय नन्ना’हा दाक्षिणात्य चित्रपट भावनिक आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. नानी वडिलांची भूमिका साकारत असून मृणालने नानीची मैत्रिणीचे पात्र साकारले. ‘हाय नन्ना’च्या कथेचे लेखन आणि दिग्दर्शन शौर्यव यांनी केले आहे. चित्रपट येत्या २१ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नानी आणि मृणाल ठाकूर सोबतच, कियारा खन्ना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून काही महिन्यांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसाचा पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे जाणून घ्या

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

तुम्ही रेल्वे वाले, आम्ही लाथ मारून जागा दाखवू; होमगार्डनं धावत्या लोकलमध्येच गार्डच्या मारली लाथ, VIDEO व्हायरल

Avoid Using Kokum: कोणत्या भाज्यांमध्ये कोकम टाकू नये?

MLC Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा डाव; पाठिंब्यासाठी ठाकरेंसमोर ठेवली एक अट

SCROLL FOR NEXT