Tollywood Actor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tollywood Movies : दाक्षिणात्य सुपरस्टारची एका चित्रपटासाठी घसघशीत पैशांची मागणी; पैसे पाहून व्हाल अवाक

चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत प्रभासचे नाव समाविष्ट आहे. आता प्रभाससोबत अल्लू अर्जुनचेही नाव जोडले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपट (Tollywood) गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहेत. आता टॉलिवूडची ही जादू दाक्षिणात्य प्रेक्षकांबरोबरच हिंदी प्रेक्षकांवर दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'बाहुबली' आणि 'पुष्पा: द राइज' (Bollywood Film) सारखे उत्तम चित्रपट, ज्यांनी उत्तरेतही उत्तम कलेक्शन केले. या चित्रपटांच्या यशामध्ये प्रभास आणि अल्लू अर्जुन सारख्या अनेक स्टार्सची लोकप्रियता दिसून येत आहे. सर्वच प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. हे स्टार्स प्रत्येक प्रकल्पासाठी किती शुल्क आकारतात ते तुम्हाला माहित आहे का? (Bollywood Actor)

चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत प्रभासचे नाव समाविष्ट आहे. प्रभास त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 100 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम घेतो. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, प्रभासने त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटासाठी संपूर्ण 120 कोटी रुपये घेतले आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सच्या यादीत प्रभाससोबत अल्लू अर्जुनचेही नाव जोडले जाते. अल्लू अर्जुनने 'पुष्पा: द राइज'साठी 60 कोटी रुपये घेतले होते. या चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याची फी दुप्पट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन 'पुष्पा'च्या पुढील भागासाठी 125 कोटी इतके मानधन घेत आहे. असे झाले तर अल्लू अर्जुन हा टॉलिवूडचा सर्वाधिक मानधन घेणारा स्टार बनेल.

प्रभास आणि अल्लू अर्जुन व्यतिरिक्त महेश बाबू 70 कोटी घेतो, तर पवन कल्याण एका चित्रपटासाठी 50 ते 65 कोटी घेतो. यासह, ज्युनियर एनटीआर 30 ते 80 कोटी रुपये आणि चिरंजीवी 50 कोटी रुपयांपर्यंत एका चित्रपटासाठी पैसे घेतो. राम चरण आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी 30 ते 70 कोटी इतकी मोठी रक्कम घेतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यो यो हनी सिंगच्या पुण्यातल्या कॉन्सर्ट वर पावसाच सावट

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT