आर्यन खान आज NCB समोर होणार हजर SaamTvNews
मनोरंजन बातम्या

आर्यन खान आज NCB समोर होणार हजर

३० ऑक्टोबर रोजीआर्यन खान तुरुंगातून बाहेर आला होता.

सूरज सावंत

मुंबई - बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला Aryan Khan क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खान सध्या जामिनावर बाहेर आहे. आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने Mumbai High Court अटी व शर्तींवर सशर्त जामीन मंजूर Bail granted केला आहे. त्यानुसार आर्यनला दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. ३० ऑक्टोबर रोजीआर्यन खान तुरुंगातून बाहेर आला होता.

हे देखील पहा -

तब्बल २७ दिवसानंतर आर्यनची सुटका झाली होती. २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्या नेतृत्वाखाली कॉर्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा मारण्यात आला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणात आर्यनसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. यावेळी आर्यनसोबत मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट हे दोघे सुद्धा तुरुंगात होते. आता तिघे जामिनावर बाहेर आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, ४ महिन्यात ₹५०० ने महागला

Jaggery Benefits: पूर्वी बाहेरुन आल्यावर पाहुण्यांना गूळ पाणी का द्यायचे? काय आहेत गूळ पाण्याचे फायदे?

हवेत भिरकावलं, चिमुकल्याला आपटलं; रिक्षाचालकाच्या विकृतीचा कळस

संतप्त गावकऱ्यांचा भोंदूबाबाला चोप, गावकऱ्यांनी कशी घडवली अद्दल? VIDEO

Global Economic Crisis : युद्धाची धग, घरोघरी पेटणार वणवा; जगात मंदी येणार?

SCROLL FOR NEXT