Prathamesh Paratb Instagram/ @prathameshparab
मनोरंजन बातम्या

Pratahmesh Parab: प्राजू्च्या प्रेमासाठी वेड्या झालेल्या दगडूला रियल लाईफमध्ये मिळाली प्राजू?, चर्चेला उधाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prathamesh Parab Lovestory: प्रथमेश परबने प्रेक्षकांच्या मनावर छाप आपल्या उत्तम अभिनयाने सोडली आहे. आता पर्यंत प्रथमेश प्रेक्षकांच्या भेटीला ३५ % काठावर पास, उर्फी, टाईमपास, टाईमपास २, टाईमपास ३, टकाटक आणि बऱ्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता. टाईमपास चित्रपटातील सर्वाधिक गाजलेले पात्र म्हणजे दगडू. दगडूने आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनावर राज्य केले आहे. त्याच्यासोबतच प्राजूने ही प्रेक्षकांच्या मनावर आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला आहे.

टाईमपास चित्रपटाचे आत्तापर्यंत ३ भाग आले. त्या तीनही भागांवर प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. दगडूच्या चित्रपटात जरी प्राजू असली तरी त्याची आत्तापर्यंत रियल लाईफमध्ये प्राजू नव्हती. पण त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टवरुन चांगलीच चर्चा होते ती रियल लाईफमधील प्राजूची. दिवाळीनिमित्त प्रथमेशने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेला उधाण आले आहे.

पारंपारिक कपड्यांमधील दोघांचा हा रोमँटिक फोटो पाहून चाहत्यांनी "दादूस आमची वहिनी काय?", असा प्रश्न प्रथमेशला विचारला आहे. प्रथमेशने त्याच्या मैत्रिणीबरोबरच्या शेअर केलेल्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. प्रथमेश रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटलं जात आहे.क्षितीजासोबतचे प्रथमेशचे हे पहिलेच फोटोशूट नाही, याआधी ही त्यांनी फोटोज शेअर केले आहेत. फोटोशूट जरा वेगळे असल्याने सोशल मीडियावर सर्वांनीच प्रश्न विचारत भांडावून सोडले आहे.

शेअर केलेल्या फोटोतील “निमित्त जरी दिवाळीचं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्वाचं!” या ओळीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. दोघांच्या ही प्रेमावर अजून दोघांकडून ही उत्तरे मिळालेले नाहीत.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT