Tiger Shroff latest news saam tv
मनोरंजन बातम्या

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

Tiger Shroff firing incident in Juhu Mumbai latest update: मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार टायगर श्रॉफ सुरक्षित आहे.

Omkar Sonawane

अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची घटना मुंबईतील जुहू परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. जुहू परिसरातील पुष्पा पार्क मैदानावर टायगर श्रॉफ फुटबॉल खेळण्यासाठी गेला असताना गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. टायगर श्रॉफ सुरक्षित असून, त्याला गोळी लागल्याने कोणतीही दुखापत झालेली नाही, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील जुहू पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून गोळीबार नेमका कोणाकडून आणि कोणत्या कारणातून झाला, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मुंबई पोलिसांची 12 पथके गोळीबार करणाऱ्याच्या शोधासाठी रवाना झालीय. तर या घटनेत रिक्षा चालक हा गंभीर जखमी झालाय. फुटबॉल मॅच खेळून घरी जात असताना टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे.

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबाराच्या वृत्तावरून काँग्रेसचा सरकारवर निशाणा

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या वृत्ताने मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत नेमकं चाललंय तरी काय, असा संतप्त सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार, तसेच अनेक अभिनेते आणि निर्मात्यांना मिळणाऱ्या धमक्यांचा दाखला देत सचिन सावंत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईतील कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. ‘महाराष्ट्राचा बिहार झाला’ असं म्हणण्याची वेळ आली होती, मात्र आता तर ‘बिहार बरा’ असं म्हणण्याची वेळ आल्याची बोचरी टीकाही सचिन सावंत यांनी केली आहे. मुंबईला गुन्हेगारांच्या दहशतीत ढकलणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, असं म्हणत त्यांनी आपल्या ट्विटमधून सरकारवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT