Tiger 3  Saam Tv
मनोरंजन बातम्या

कतरिना- सलमानचा Tiger 3 बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला, फ्लॉप चित्रपटाची आजची कमाई किती?

Tiger 3 Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या कमाईचा आलेख जास्त दिसत नाही.

Chetan Bodke

Tiger 3 Day 10 Box Office Collection

सलमान- कतरिनाचा ‘टायगर ३’ बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यासाठी कुठेतरी अपयशी ठरला, असं म्हटलं वावगं ठरणार नाही. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. अद्यापही चित्रपटाच्या कमाईचा आकडा हा घसरताच आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी फक्त सहा कोटींचीच कमाई केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सॅकल्निकच्या अहवालानुसार, पहिल्या आठवड्यामध्ये चित्रपटाने एकट्या भारतात १८७ कोटींची कमाई केली आहे. हिंदी आवृत्तीमध्ये १८३ कोटी, तेलुगू आवृत्तीमध्ये ४.२ कोटी तर तमिळ आवृत्तीमध्ये जेमतेम ६३ लाख रुपयेच कमावले आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या कमाईचा आलेख जास्त दिसत नाही. (Bollywood)

विकेंडला चित्रपट उत्तम कमाई करेल अशी सर्वांनाच आशा होती. पण चित्रपटाने इतकी खास कमाई केली नाही. दहाव्या दिवशी अर्थात मंगळवारी चित्रपटाने फक्त ६ कोटी ४८ लाख रुपये कमाईंचीच कमाई केली आहे. जर चित्रपटाचा आलेख असाच घसरता राहिला, तर लवकरच चित्रपटाला आपला गाशा गुंडाळत थिएटरमधून बाहेर पडावे लागेल. (Bollywood Film)

चित्रपटाने देशामध्ये फक्त २४३. ८५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे. (Latest News)

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अर्थात १२ नोव्हेंबरला हा चित्रपट जगभरामध्ये रिलीज झाला आहे. सलमान खानने चित्रपटामध्ये, रॉ एजंट टायगरचे पात्र, तर कतरिनाने आयएसआय एजंट झोयाचे पात्र साकारले. तर इमरान हाश्मी एका खतरनाक व्हिलनच्या भूमिकेचे पात्र साकारणार आहे.

मनिष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ १० नोव्हेंबर २०२३ रोजी अर्थात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. ‘एक था टायगर’चा हा ट्रायोलॉजी (तिसरा भाग) आहे. पहिला भाग ‘एक था टायगर’, दुसरा भाग ‘टायगर झिंदा हैं’ हा होता. हे दोन्ही भाग सुपरहिट ठरले होते. आता तिसरा भाग म्हणजे ‘टायगर ३’ रिलीज होणार असून हा भाग देखील सुपरहिट ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

Nashik News : माजी आयुक्ताला ईडीचा दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनात ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते?

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

SCROLL FOR NEXT