ठरलं ! 'ही' अभिनेत्री करणार 'Indian Idol Marathi' चं सूत्रसंचालन Saam Tv
मनोरंजन बातम्या

ठरलं ! 'ही' अभिनेत्री करणार 'Indian Idol Marathi' चं सूत्रसंचालन

सोनी वाहिनीवर ‘इंडिया आयडॉल’ India Idol या हिंदी रियॅलिटी शो ची सुरुवात करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : २००४ मध्ये सोनी वाहिनीवर ‘इंडिया आयडॉल’ India Idol या हिंदी रियॅलिटी शो ची सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून या कार्यक्रमाचे सलग १२ पर्व पार पडली आहेत. या हिंदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नव्या प्रतिभेला संधी देणे आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य न्याय मिळवून देण्याकरिता या मंचाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.

हे देखील पहा-

याचेच एक पुढचे पाऊल म्हणजे हा शो आता मराठी मध्ये देखील येणार आहे. याची सुरूवात २२ नोव्हेंबरपासून होत आहे. या शोचे परीक्षक म्हणून अजय आणि अतुल ही संगीत क्षेत्रामधील जोडी काम बघणार आहे. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे, ती या शोचा अ‍ॅंकर कोण असणार याची. मराठी मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर swanandi tikekar या शोची सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

सोनी मराठीवर नुकताच एक प्रमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये स्वानंदी टिकेकर ही दिसत आहे. सोनी मराठी वाहिनीने हा प्रोमे प्रदर्शिक करत सांगितले आहे. की, सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार स्वानंदी टिकेकर! अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा! २२ नोव्हेंबरपासून,आपल्या सोनी मराठीवर, असे सांगण्यात आले आहे.

स्वानंदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे व्हिडीओ फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. पारंपरिक असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक लूक हा तिच्या चाहत्यांकरिता खास असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

SCROLL FOR NEXT