bigg boss season 16 Saam TV
मनोरंजन बातम्या

बिग बॉस १६ च्या घरात कोणकोणते सेलिब्रिटी येणार?; यादीच आली समोर

सोशल मीडियावर बिग बॉस १६ आगामी सीझनचा प्रोमो रिलीज झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) होस्टकरत असलेला प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस(Bigg Boss) हा एक टीव्ही जगतातील लोकप्रिय शो आहे. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होण्यास उत्सुक असतात. शोचे होस्ट देखील प्रेक्षकांना टिव्हीवर खिळवून ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. शो सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला आहे. आतापर्यंत शोचे पंधरा सीझन झाले आहेत. बिग बॉसचे चाहते नवीन पर्वाच्या प्रतीक्षेत आहेत. बिग बॉस १६ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. बिग बॉसचा सीझन १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

बिग बॉसच्या आगामी सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. दरम्यान बिग बॉस १६ मध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, याची अधिकृत माहिती अद्यापही समोर आली नाही. मात्र, रिपोर्ट्सनुसार खतरो के खिलाडी १२ मधील काही स्पर्धक बिग बॉस १६ मध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावर बिग बॉस १६ आगामी सीझनचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये सर्वाची लाडकी इमलीची झलक पाहायला मिळते आहे. प्रोमोमधील 'इमली का बूटा बेरी का पेड' हे गाणं प्रेक्षकाचं लक्ष वेधते आहे. प्रोमोवरून बिग बॉसमध्ये इमली अर्थात सुंबुल तौकीर असल्याचे समजते आहे. बिग बॉसमुळे अनेक स्पर्धकांना स्वत:ची वेगळी ओळख मिळते.

माहितीनुसार, 'बिग बॉस १६ मध्ये मागील पर्वातील काही स्पर्धक सिनिअर्स म्हणून या पर्वात सहभागी होणार आहेत. करण कुंद्रा, हिना खान, गौहर खान, रश्मी देसाई, पारस हे स्पर्धक सहभागी होणार असल्याचे कळते आहे. बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्लच्या जागी शेहनाज गिल या पर्वात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT