hrithik roshan  saam tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: 'ग्रीक गॉड' हृतिक रोशनचा 'क्रिश ४' लवकरच; चित्रपटात असतील अनेक ट्विस्ट

हृतिक रोशनच्या क्रिश ४ चित्रपटाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. क्रिश ४ या चित्रपटावर काम सुरू झालं असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॅालिवूडचा 'ग्रीक गॉड' अभिनेता हृतिक रोशन(Hrithik Roshan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे जबरदस्त चर्चेत आहे. हृतिक रोशन एकापेक्षा एक 'अॅक्शन थ्रिलर' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकेकाळी सुपरस्टार हृतिकच्या क्रिशने प्रेक्षकांना प्रंचड वेड लावले होते. त्यानंतर चित्रपटाचे ३ भाग प्रदर्शित झाले. या तिन्ही भागांनी बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

चित्रपटातील अॅक्शन सीन्सना प्रेक्षकांनी चांगलीच पंसती दिली होती. गेल्या वर्षी जानेवारीत हृतिकने क्रिश-४(Krish 4) ची घोषणा केली होती. आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत रंजक अपडेट समोर आली आहे.

हृतिक रोशनच्या क्रिश ४ चित्रपटाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. क्रिश ४ या चित्रपटावर काम सुरू झालं असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

माहितीनुसार, क्रिश ४ या चित्रपटाची कथा मागचे संदर्भ घेऊनच पुढे सुरु होईल, जिथे क्रिश ३ ची कथा संपली होती, तिथूनच क्रिश ४ या भागाची नवीन कथा सुरू होईल. चित्रपटात नवीन पात्र असतील. इतकेच नाही तर चित्रपटाची कथा आधीपेक्षा रोमांचक ट्विस्टसह पूर्णपणे वेगळी असेल.

क्रिश ४ मध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्सही पाहायला मिळणार आहेत. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहेत. क्रिश ४ या चित्रपटात हृतिक रोशन किमान एक गाणे स्वत:च्या आवाजात गाणार असल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूडचे दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या 'क्रिश' सीरीजने प्रेक्षकांच्या मनात अशी जागा केली आहे, जी आज देखील कोणी घेऊ शकत नाही. या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झाले, जे सुपरहिट ठरले. आता क्रिशचा ४ भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हृतिक रोशन लवकरच विक्रम वेधा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही; CM फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम|VIDEO

Bhandara : शाळेत जाताना विद्यार्थिनीवर काळाची झडप; चिखलात सायकल स्लिप होताच ट्रॅक्टरची धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Nagpur Food : नागपूरच्या अशा Top 8 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Kolhapuri Chappal: सहज ओळखता येणार कोल्हापुरी; कोणी-कुठे बनवली चप्पल तेही कळणार

भावंडं खेळत होती, नराधमानं बागेत नेलं, १० वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT