Maharashtra Shaheer Teaser Viral Instagram @ankushpchaudhari
मनोरंजन बातम्या

Maharashtra Shaheer: 'महाराष्ट्र शाहीर'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल! अल्पावधीत मिळवले लाखो व्ह्यूज

Maharashtra Shaheer Teaser Views: केदार शिंदे आपल्या आजोबांचे जीवन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

Pooja Dange

Ankush Chaudhari Social Media Post: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे टीझर प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. 2023 हे वर्ष महाराष्ट्र शाहीर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या या खास वर्षानिमित्त नातू केदार शिंदे आपल्या आजोबांचे जीवन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

अंकुश चौधरी चित्रपटामध्ये शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. अभिनेता अंकुश चौधरीने चित्रपटाचा टीझरविषयी मोठी माहिती दिली आहे.

अंकुश चौधरीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकुशने 'महाराष्ट्रा शाहीर' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर लिहिले आहे, 'महाराष्ट्र शाहीर'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल. ३ दिवसांत ५० लाखा पेक्षा अधिक लोकांनी पाहिला टीझर. धन्यवाद.

याच सोबत अंकुशने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अधिक माहिती देत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. कॅप्शनमध्ये अंकुश म्हणाला आहे की, फक्त ३ दिवसांत 'महाराष्ट्र शाहीर' च्या टीझरने सोशल मीडियावर ५० लाखांपेक्षा अधिक Views चा टप्पा पार केलाय, रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळेच हे शक्य झालंय.. 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाच्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.! जय महाराष्ट्र

अंकुशच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत त्याला शुभेच्छा देत आहेत. तसेच टीझरमधील त्याची भूमिका पाहून त्याचे कौतुक देखील करत आहेत. 'चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच यशस्वी झाला', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT